Agriculture news in marathi ‘Public facilities for crop insurance proposal Center operators should not charge ' | Agrowon

‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र चालकांनी शुल्क घेऊ नये’

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी) चालकांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारु नये. शुल्क घेतल्याचे आढळल्यास संबंधित केंद्रांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी दिला.

नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी) चालकांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारु नये. शुल्क घेतल्याचे आढळल्यास संबंधित केंद्रांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी दिला.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीकविमा पोर्टलवर स्वतः विमा प्रस्ताव सादर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

पंतप्रधान पिकविमा योजना खरीप हंगाम आणि पुर्नरचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना (मृग बहार) जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकरी रविशंकर चलवदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश पठारे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक ए. एस. शिंदे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, तंत्र अधिकारी पी. ए. गायके, विमा कंपनी प्रतिनिधी गौतम कदम, सीएससी प्रतिनिधी सदाशिव पवार यांची उपस्थिती होती.

ईटनकर म्हणाले, ‘‘प्रस्ताव सादर करण्यासाठी शुक्रवार (ता.३१) पर्यंतची अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी पिकविमा प्रस्ताव सादर करावे. आतापर्यंत एक लाख विमाप्रस्ताव सादर केले आहेत.’’ 
जिल्ह्यात राबविण्यासाठी इफको टोकियो जनरल इंशुरन्स कंपनीची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनअंतर्गत ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...