हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना
पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे.
रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील बचत गटात कार्यरत असलेल्या १५० महिलांना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याच महिलांना आपापल्या तालुक्यातील पर्यटन स्थळे, खाद्य संस्कृती याची माहिती दिली जाणार आहे. त्या महिलांना परिपूर्ण गाइड म्हणून पुढे आणले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये टुरिस्ट गाइड प्रशिक्षणाला आवश्यक निधीची तरतूद करण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. महिलांना चारचाकी चालविण्याच्या प्रशिक्षणासह गाइडचे प्रशिक्षण देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून वीस लाख रुपये निधीची तरतूदही केली गेली आहे. गाइड संदर्भातील प्रशिक्षण एका खासगी संस्थेमार्फत दिले जाणार आहे.
जिल्ह्यात पर्यटक दाखल होतात. त्यात अनेक महिलांचे गटही असतात. गणपतीपुळे, मार्लेश्वर, दापेालीची चंडिका देवी, राजापूरची गंगा यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळेच पर्यटकांना माहिती असतात; परंतु प्रत्येक तालुक्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, तिथे पर्यटक गेलेले नाहीत. त्याची माहिती जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना करून देणे, तिथे नेऊन माहिती देणे यासाठी तज्ज्ञ गाइडची आवश्यकता आहे. केरळ, गोव्यामध्ये या गाइडच्या माध्यमातून रोजगारही मिळतो. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देतानाच प्रशिक्षित गाइड बनविण्यात येणार आहे.
या दुहेरी भूमिका महिला सहजपणे पार पाडू शकतील. तसेच महिलांना रोजगारही मिळू शकेल. जिल्ह्यात गाइडच नसल्यामुळे पर्यटकांना माहिती देणे शक्य होत नाही. ती उणीव जिल्हा परिषदेच्या रत्नतरुणी योजनेतून भरून काढली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेला परिपूर्ण माहिती दिली जाईल. प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्रही त्या महिलांना दिले जाणार आहे. अनेक पर्यटक कुटुंबे, महिलांना आकर्षित करून घेण्यासाठीचा हा उपक्रम लवकरच प्रत्यक्षात अमलात जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५० महिलांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. पर्यटनातून महिलांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे.
- 1 of 1099
- ››