Agriculture news in Marathi ‘Ratnataruni’ scheme to provide employment to women | Agrowon

महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे.

रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील बचत गटात कार्यरत असलेल्या १५० महिलांना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याच महिलांना आपापल्या तालुक्यातील पर्यटन स्थळे, खाद्य संस्कृती याची माहिती दिली जाणार आहे. त्या महिलांना परिपूर्ण गाइड म्हणून पुढे आणले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये टुरिस्ट गाइड प्रशिक्षणाला आवश्यक निधीची तरतूद करण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. महिलांना चारचाकी चालविण्याच्या प्रशिक्षणासह गाइडचे प्रशिक्षण देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून वीस लाख रुपये निधीची तरतूदही केली गेली आहे. गाइड संदर्भातील प्रशिक्षण एका खासगी संस्थेमार्फत दिले जाणार आहे.

जिल्ह्यात पर्यटक दाखल होतात. त्यात अनेक महिलांचे गटही असतात. गणपतीपुळे, मार्लेश्‍वर, दापेालीची चंडिका देवी, राजापूरची गंगा यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळेच पर्यटकांना माहिती असतात; परंतु प्रत्येक तालुक्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, तिथे पर्यटक गेलेले नाहीत. त्याची माहिती जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना करून देणे, तिथे नेऊन माहिती देणे यासाठी तज्ज्ञ गाइडची आवश्‍यकता आहे. केरळ, गोव्यामध्ये या गाइडच्या माध्यमातून रोजगारही मिळतो. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देतानाच प्रशिक्षित गाइड बनविण्यात येणार आहे.

या दुहेरी भूमिका महिला सहजपणे पार पाडू शकतील. तसेच महिलांना रोजगारही मिळू शकेल. जिल्ह्यात गाइडच नसल्यामुळे पर्यटकांना माहिती देणे शक्य होत नाही. ती उणीव जिल्हा परिषदेच्या रत्नतरुणी योजनेतून भरून काढली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेला परिपूर्ण माहिती दिली जाईल. प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्रही त्या महिलांना दिले जाणार आहे. अनेक पर्यटक कुटुंबे, महिलांना आकर्षित करून घेण्यासाठीचा हा उपक्रम लवकरच प्रत्यक्षात अमलात जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५० महिलांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. पर्यटनातून महिलांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी याचा निश्‍चितच फायदा होणार आहे.


इतर बातम्या
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...