From ‘Rayat Kranti’ in Nanded Holi of Government Order
From ‘Rayat Kranti’ in Nanded Holi of Government Order

नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन आदेशाची होळी

नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड तहसील समोर शासकीय आदेशाची होळी करण्यात आली.

नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड तहसील समोर शासकीय आदेशाची होळी करण्यात आली.

नायगाव येथे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होळी आंदोलन झाले. तर मुखेड येथे जिल्हाध्यक्ष बालाजी ढोसणे यांनी आंदोलन केले. यात अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकरी विरोधी धोरणाची होळी करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

मागण्यांचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी होते. नायगाव येथे शहाजी कदम, साहेबराव चट्टे, गणेश गिरगावकर, अवधूत कदम, शिवाजी गायकवाड, शंकर तमन बोईनवाड, विश्वनाथ शिंदे, सोनाली हंबर्डे, विजया काचावार उपस्थित होते. तर मुखेड येथे बालाजी ढोसणे, नवनाथ पाटील, संगीत जाधव, विनायक माहेगावकर, दिंगबर बनबरे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com