Agriculture news in Marathi ‘Rohyo’ farms include plastic lining | Agrowon

‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक अस्तरीकरणाचा समावेश

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनुदान योजनेतून आता प्लॅस्टिक अस्तरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरांद्वारे शेततळे खोदता येते. त्यासाठी मजुरीचा दर २३८ रुपये आहे.

पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनुदान योजनेतून आता प्लॅस्टिक अस्तरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरांद्वारे शेततळे खोदता येते. त्यासाठी मजुरीचा दर २३८ रुपये आहे. इनलेट व आऊटलेट विरहित मजुरांद्वारे होणाऱ्या खोदाईचे आर्थिक मापदंड बघता ३० मीटर लांबी x ३० मीटर रुंदी x ३ मीटर खोलीच्या शेततळ्यासाठी एकूण रक्कम ५,६८,३८० रुपये उपयोजना डोंगरी भागासाठी गृहीत धरण्यात आली आहेत. तसेच इतर क्षेत्रासाठी ही रक्कम ५,१४,८९५ रुपये अपेक्षित आहे.

रोजगार हमी योजनेच्या अपर मुख्य सचिवांनी जारी केलेल्या आदेशानुसार शेततळ्यात आता अस्तरीकरणाचा भाग देखील समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थात, त्यासाठी निकष मात्र कृषी विभागाने निश्चित केलेल्या नियमावलीतील वापरले जातील. रोजगार हमी विभागाच्या या निर्णयामुळे अस्तरीकरणाच्या कामांबाबत होत असलेल्या खर्चाच्या बाबी कशा व कोणत्या पद्धतीने बसवायच्या या विषयीचा संभ्रम दूर झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

‘लॅमिफॅब्जस् अॅन्ड पेपर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’चे विपणन व्यवस्थापक अंगध होळंबे म्हणाले, ‘‘रोहयोमध्ये शेतकरी आधी स्वःखर्चातून अस्तरीकरण करीत होते. मात्र, आता राज्य शासनाने अस्तरीकरणाचा समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होईल. प्लॅस्टिक पेपर टाकल्यामुळे पाणीसाठा जास्त काळ उपलब्ध होतो. उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी अस्तरीकरणाची बाब महत्त्वाची समजली जाते.’’


इतर अॅग्रो विशेष
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
विमा कंपन्यांना आयुक्तांचा दणका पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत...