‘कृषी विद्यापीठाचे बियाणे रब्बीत विकत मिळणार’

औरंगाबाद : ‘‘येत्या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे बियाणे विकत मिळण्याची सोय उपलब्ध होईल,’’ अशी माहिती विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र औरंगाबादचे रामेश्वर ठोंबरे यांनी दिली.
‘Seeds of Agricultural University Will be bought in Rabbi '
‘Seeds of Agricultural University Will be bought in Rabbi '

औरंगाबाद : ‘‘येत्या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे बियाणे विकत मिळण्याची सोय उपलब्ध होईल,’’ अशी माहिती विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र औरंगाबादचे रामेश्वर ठोंबरे यांनी दिली. 

ठोंबरे म्हणाले, ‘‘मागील चार वर्षांपासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात का होईना, ज्या त्या जिल्ह्यातील विद्यापीठाच्या केंद्रात बियाणे उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक अथवा दोन बॅगसाठी थेट परभणीला जावे लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांची बियाणे गरज काही प्रमाणात का होईना भागवली जाते.’’ 

‘‘सुधारित तंत्रज्ञान बियाणे माध्यमातून शेतकऱ्यांना पोहच होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करत आहे. विद्यापीठ बियाण्यास मोठी मागणी राहते. या रब्बी हंगामात ज्वारी, करडई, हरभरा, जवस या रब्बी पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिले जाईल’’, असे बीज प्रक्रिया केंद्राचे प्रमुख डॉ. एस. बी. घुगे यांनी विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र पैठण रस्ता, औरंगाबाद कार्यालयास पत्राद्वारे कळविले.

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र पैठण रोड (बियाणे विक्री केंद्र ) औरंगाबाद येथे बियाणे मिळेल. शेतकऱ्यांनी रामेश्वर ठोंबरे ९४२०४०६९०१ या व्हाट्स क्रमांकावर बियाणे मागणी नोंदवू शकतात, असे कळविण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com