Agriculture news in marathi ‘She’ is not a pink bondage but a bondage | Agrowon

‘ती’ गुलाबी बोंडअळी नसून बोंडसड

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे शुक्रवारी (ता.२०) केंद्र शासनाच्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूरच्या पथकाने वाई बाजार येथील बंडू गेडाम यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली.

नांदेड  : माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे शुक्रवारी (ता.२०) केंद्र शासनाच्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूरच्या पथकाने वाई बाजार येथील बंडू गेडाम यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी पथककाडून कपाशीवर बोंडअळी नाही तर बोंडसड होऊन त्यावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.

यावेळी नागपूर कीटक व्यवस्थापन केंद्राच्या केंद्रीय पथकात वनस्पती पॅथॉलॉजीचे वनस्पती संरक्षण अधिकारी एस. महेश, तांत्रिक अधिकारी के. नीतीराज यांचा समावेश होता.  
  सोबतच जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, तालुका कृषी अधिकारी बी. बी. मुंडे, कृषी सहाय्यक विठ्ठल ईटकापल्ले, प्रगत शेतकरी संदीप पडलवार, डॉ. बाबा डाखोरे, कैलाश बेहेरे, मृणाल येवतकर, अमजद हैदर खान पठाण आदींची उपस्थिती होती. 
अमृत देशमुख यांनी बोंडअळी संदर्भात पडताळणी पथकासमोर मुद्दे मांडले.

कापूस बियाणे घेताना घ्यावयाची दक्षता या संदर्भात केंद्रातील पथकांनी विश्लेषक विनिमय करून शेतकऱ्यांनी समूह शेतीचा पर्याय निवडल्यास कापसावर आलेल्या भयंकर रोगावर देखील नियंत्रण मिळवता येते. यासाठी येथील शेतकऱ्यांना केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूर येथे प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही पथकाने दिला. लवकरच माहूर तालुक्यातील वीस ते पंचवीस शेतकरी नागपूर येथे प्रशिक्षणासाठी आणणार असल्याची ग्वाही डॉ. डाखोरे व संदीप पडलवार यांनी दिली. बॅक्टेरियामुळे बोंडसड होऊन कालांतराने त्यात अळी निर्माण होऊन होणाऱ्या नुकसानीचे निराकरण करण्यासाठी पथकातील वनस्पती पॅथॉलॉजीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...