संघर्षातून उभारली ‘तिने’शेतकरी उत्पादक कंपनी

. पुढे रोजगार म्हणून ‘अन्नपूर्णा महिला बचत गट’ स्थापन केला. त्यातून महिलांचे व्यावसायिक संघटन वाढत गेले. अन् त्यातूनच ‘विमेन्स पॉवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ नावाने कंपनीही सुरू केली.
‘She’, establish company, emerged from the struggle
‘She’, establish company, emerged from the struggle

नाशिक : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सुरुवातीपासून ‘ती’च्या वाट्याला संघर्ष आला. मात्र, ती खचली नाही. गरिबी, आजारपण अशी अनेक संकटे झेलत गेली. पुढे रोजगार म्हणून ‘अन्नपूर्णा महिला बचत गट’ स्थापन केला. त्यातून महिलांचे व्यावसायिक संघटन वाढत गेले. अन् त्यातूनच ‘विमेन्स पॉवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ नावाने कंपनीही सुरू केली. हा प्रवास आहे घोटी (ता. इगतपुरी) येथील मथुरा तानाजी जाधव यांच्या संघर्ष अन् जिद्दीचा.

१९९९ ते २००४ दरम्यान त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना शेतीही करत. पती तानाजी हे ग्रामपंचायत कर्मचारी त्यांना मर्यादित वेतन होते. त्यामुळे आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली. दरम्यान रोजगाराच्या संधीबाबत माहिती मिळाली. त्यातूनच २००६ साली अन्नपूर्णा महिला बचत गटाची स्थापना झाली. पुढे २००९ साली हातसडीच्या तांदळाचे उत्पादन अन् विक्री या कामाची सुरुवात झाली. महिलांकडून कायमस्वरूपी रोजगाराची मागणी होऊ लागली. यावर कामाच्यासंबंधी विस्तारावर भर दिला.

बचत गटाच्या माध्यमातून २००८ ते २०१० पर्यंत म्हैसपालन याशिवाय मागील वर्षापर्यंत सेंद्रिय गूळ उत्पादन व विक्रीही केली. सध्या वाळवण प्रकारात नागली पापड, नागली सत्त्व, भरडलेल्या विविध डाळी, १७ प्रकारचे धान्यापासून दळून-भाजून थालीपीठ, भाजणी पीठ, हिरवा मसाला अशी प्रमुख उत्पादने आहेत. ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली. विविध प्रदर्शनातून उत्पादित मालाची नवी मुंबई व ठाणे येथे विक्री त्या करतात. यापूर्वी महालक्ष्मी सरस प्रदर्शनात १० लाखांची उलाढाल यशस्वीपणे केली आहे.

रोजगार निर्मितीतून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. संकटे आली अन् त्यांनी शिकवलं त्यातूनच हे कष्टाने उभं राहिलं. कष्ट अन् जिद्दीतून दोन्ही मुले इंजिनिअर बनविली आहेत. आता महिलांच्या माध्यमातून काम करत विधायक कार्य उभे करून महिलांना उभे करायचे आहे. - मथुरा जाधव

कामाची वैशिष्ट्ये

  • १५ महिलांना वर्षभर रोजगार
  • हंगामी प्रति महिना ५ लाखांपर्यंत तर वार्षिक १५ लाखांवर उलाढाल  
  • आदिवासी, विधवा व गरजू महिलांना हक्काचा रोजगार
  • आदिवासी महिलांकडून उत्पादित भाताची खरेदी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com