Agriculture news in Marathi ‘She establish a farming company, emerged from the struggle | Agrowon

संघर्षातून उभारली ‘तिने’शेतकरी उत्पादक कंपनी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 मार्च 2021

. पुढे रोजगार म्हणून ‘अन्नपूर्णा महिला बचत गट’ स्थापन केला. त्यातून महिलांचे व्यावसायिक संघटन वाढत गेले. अन् त्यातूनच ‘विमेन्स पॉवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ नावाने कंपनीही सुरू केली.

नाशिक : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सुरुवातीपासून ‘ती’च्या वाट्याला संघर्ष आला. मात्र, ती खचली नाही. गरिबी, आजारपण अशी अनेक संकटे झेलत गेली. पुढे रोजगार म्हणून ‘अन्नपूर्णा महिला बचत गट’ स्थापन केला. त्यातून महिलांचे व्यावसायिक संघटन वाढत गेले. अन् त्यातूनच ‘विमेन्स पॉवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ नावाने कंपनीही सुरू केली. हा प्रवास आहे घोटी (ता. इगतपुरी) येथील मथुरा तानाजी जाधव यांच्या संघर्ष अन् जिद्दीचा.

१९९९ ते २००४ दरम्यान त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना शेतीही करत. पती तानाजी हे ग्रामपंचायत कर्मचारी त्यांना मर्यादित वेतन होते. त्यामुळे आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली. दरम्यान रोजगाराच्या संधीबाबत माहिती मिळाली. त्यातूनच २००६ साली अन्नपूर्णा महिला बचत गटाची स्थापना झाली. पुढे २००९ साली हातसडीच्या तांदळाचे उत्पादन अन् विक्री या कामाची सुरुवात झाली. महिलांकडून कायमस्वरूपी रोजगाराची मागणी होऊ लागली. यावर कामाच्यासंबंधी विस्तारावर भर दिला.

बचत गटाच्या माध्यमातून २००८ ते २०१० पर्यंत म्हैसपालन याशिवाय मागील वर्षापर्यंत सेंद्रिय गूळ उत्पादन व विक्रीही केली. सध्या वाळवण प्रकारात नागली पापड, नागली सत्त्व, भरडलेल्या विविध डाळी, १७ प्रकारचे धान्यापासून दळून-भाजून थालीपीठ, भाजणी पीठ, हिरवा मसाला अशी प्रमुख उत्पादने आहेत. ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली. विविध प्रदर्शनातून उत्पादित मालाची नवी मुंबई व ठाणे येथे विक्री त्या करतात. यापूर्वी महालक्ष्मी सरस प्रदर्शनात १० लाखांची उलाढाल यशस्वीपणे केली आहे.

रोजगार निर्मितीतून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. संकटे आली अन् त्यांनी शिकवलं त्यातूनच हे कष्टाने उभं राहिलं. कष्ट अन् जिद्दीतून दोन्ही मुले इंजिनिअर बनविली आहेत. आता महिलांच्या माध्यमातून काम करत विधायक कार्य उभे करून महिलांना उभे करायचे आहे.
- मथुरा जाधव

कामाची वैशिष्ट्ये

  • १५ महिलांना वर्षभर रोजगार
  • हंगामी प्रति महिना ५ लाखांपर्यंत तर वार्षिक १५ लाखांवर उलाढाल  
  • आदिवासी, विधवा व गरजू महिलांना हक्काचा रोजगार
  • आदिवासी महिलांकडून उत्पादित भाताची खरेदी

 


इतर यशोगाथा
फळबागांसह एकात्मिक शेतीने जोडले...गंजेवाडी (जि. उस्मानाबाद) येथील सुदर्शन जाधव हे...
तांत्रिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय, मुरघास...सोनगाव (जि. नगर) येथील राजेश व गणेश अंत्रे या...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...