शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
‘शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करा’
पुणे ः ‘‘राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. ’’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२२) शिवजयंती नियोजन आढावा बैठकीत केले.
पुणे ः ‘‘राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घ्यावी’’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२२) शिवजयंती नियोजन आढावा बैठकीत केले.
पवार म्हणाले, ‘‘यंदा १९ फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंती आपण उत्साहात, सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरी करू. शासनाच्या आवाहनाला याही वेळेस जनतेचा प्रतिसाद मिळेल. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी येणार आहेत. शिवनेरीची विकासकामे दर्जेदार होतील. पुरातत्त्व विभाग, वन विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे, तेथे त्या घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी.’’
बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.
गेल्या वर्षी विक्रमी गर्दी
गेल्या शिवजयंतीला उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच शिवनेरी किल्ल्यावर आले होते. यावेळी या ठिकाणी उच्चांकी गर्दी झाली होती. यंदाचा उत्सव केवळ मंत्रीगट आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी प्रशासनाने सुरु केली आहे.
- 1 of 1055
- ››