शिरपुरातील ‘सौरऊर्जा’च्या कामास होणार सुरुवात

शिरपूर, जि. वाशीम ः येथील प्रस्तावित दोन मेगावॉट ऊर्जा क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Of ‘Solar Energy’ in Shirpur The work is about to begin
Of ‘Solar Energy’ in Shirpur The work is about to begin

शिरपूर, जि. वाशीम ः येथील प्रस्तावित दोन मेगावॉट ऊर्जा क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येथील प्रस्तावित जमिनीची सोमवारी (ता.२१) मोजणीची प्रक्रिया झाली. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्याची आशा बळावली आहे.

शिरपूर येथे दोन मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी या प्रकल्पासाठी लागणारी चार हेक्टर जमीन महावितरणला हस्तांतरित करावी लागेल. महावितरण ही जमीन हस्तांतरित झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामास सुरुवात होईल. 

भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी तसेच शिरपूर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी भागवत भुरकाडे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता अर्जुन जाधव, कर्मचारी विष्णू जाहिरव आदींच्या उपस्थितीत जमिनीची मोजणी करण्यात आली. लवकरच प्रकल्पासाठीच्या चार हेक्टर जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया होईल. त्यानंतर हा प्रकल्प महावितरणकडून प्रकल्पाचे काम करण्यात येईल. 

या प्रकल्पातून दोन मेगावॉट वीज दररोज उपलब्ध होईल. शिरपूरच्या शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळेल. प्रकल्पाच्या जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया ग्रामपंचायत, महसूल विभाग व महावितरणने संयुक्तपणे व जलद गतीने राबवून प्रकल्प लवकर चालू करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com