‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’वर मंगळवारी कृषिमंत्री भुसे यांचे ऑनलाइन मार्गदर्शन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागातर्फे मंगळवारी (ता.२) सकाळी ११ वाजता ‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिया’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आले. कृषिमंत्री दादा भुसे यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
On ‘Soybean Cultivation Technology and Process’ Online guidance by Agriculture Minister Bhuse on Tuesday
On ‘Soybean Cultivation Technology and Process’ Online guidance by Agriculture Minister Bhuse on Tuesday

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागातर्फे मंगळवारी (ता.२) सकाळी ११ वाजता ‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिया’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आले. कृषिमंत्री दादा भुसे यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. 

कुलगुरु डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी राहतील. कृषी आयुक्त सुहास दिवसे, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्‍वनाथा हे सहभागी होतील. इंदौर येथील अखिल भारतीय सोयाबीन संस्‍थेचे संचालक डॉ. व्‍हि. एस. भाटिया, पोकराचे प्रकल्‍प व्‍यवस्‍थापन कक्षाचे कृषी विद्यावेत्‍ता विजय कोळेकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबाद विभागीय सहसंचालक डॉ. डी. एल.जाधव, लातूर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. टी. एन. जगताप आदींचा प्रमुख सहभाग राहील. 

‘सोयाबीन पिकांचे विविध वाण व बिजोत्‍पादन तंत्रज्ञान’ यावर डॉ. एस.पी.म्‍हेत्रे, ‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर’ यावर डॉ. आळसे, ‘बीबीएफ तंत्राने सोयाबीन लागवडी’वर डॉ.स्मिता सोळंकी, ‘सोयाबीन बीज प्रक्रिया’वर डॉ. ए. एल धमक, ‘सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणी’वर डॉ. किशोर झाडे, ‘सोयाबीन पिकांतील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन’वर डॉ. पी. आर झंवर, ‘सोयाबीनवरील रोग व्‍यवस्‍थापन’ वर डॉ. के. टी. आपेट, ‘सोयाबीन पिकाचे काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, मुल्‍यवर्धन’ यावर डॉ. स्मिता खोडके आदी मार्गदर्शन करतील. 

शेतकरी, कृषी विस्‍तार कार्यकर्त्यांनी सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले. झुम मि‍टिंगद्वारे सहभागी होण्‍यासाठी आयडी ३८२ ९१२ ७८९८ व पासवर्ड ४३१४०१ यांचा वापर करावा. तसेच कार्यशाळेचे विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv वर थेट प्रक्षेपण पाहता येईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com