भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
‘परभणी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांत सोयाबीनचे ३४० हेक्टरवर बीजोत्पादन’
परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) परभणी विभागाअंतर्गत उन्हाळी हंगामात ३४० हेक्टरवर सोयाबीनच्या ‘जेएस-३३५’ या वाणांच्या प्रमाणित दर्जाचा बीजोत्पादन कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) परभणी विभागाअंतर्गत उन्हाळी हंगामात ३४० हेक्टरवर सोयाबीनच्या ‘जेएस-३३५’ या वाणांच्या प्रमाणित दर्जाचा बीजोत्पादन कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सोमवार (ता.१८) बियाणे उपलब्ध होईल,’’ अशी माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी दिली.
येत्या खरीप हंगामात सोयाबीनच्या दर्जेदार बियाण्याची उपलब्धता व्हावी. त्यासाठी सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेले शेतकरी उन्हाळी हंगामात सोयाबीनचे बीजोत्पादन घेऊ शकतात. त्यादृष्टीने महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यांत एकूण ३४० हेक्टरवर सोयाबीनच्या ‘जेएस ३३५’ या वाणांचा प्रमाणित दर्जाचा बीजोत्पादन कार्यक्रम यंदा प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणार आहे.
महामंडळास नियोजित बीजोत्पादन कार्यक्रमासंबंधित स्रोत बियाणे, स्रोत बियाणे किंमत, उन्हाळी हंगामातील महामंडळाचे सोयाबीन बीजोत्पादनाचे खरेदी धोरण आदी माहिती महाबीज जिल्हा कार्यालयाकडून घेऊन बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गतवर्षीच्या खरिपात ऐन काढणीच्या हंगामात पाऊस आला. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची प्रत खराब झाली. त्यामुळे उगवणशक्तीची समस्या येऊ शकते. त्यामुळे बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
- 1 of 1059
- ››