नांदेड, परभणीत ‘समर्थन आणि संपूर्ण स्वातंत्र्य’ आंदोलन

नांदेड: केंद्र शासनाने नुकतेच पारित केलेल्या कृषी विधयकांचे समर्थन करण्यासाठी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता.२) महात्मा गांधी पुतळा वजिराबाद येथे ‘समर्थन व संपूर्ण स्वातंत्र्य’ आंदोलन करण्यात आले.
‘Support and Total Freedom’ Movement in Nanded, Parbhani
‘Support and Total Freedom’ Movement in Nanded, Parbhani

नांदेड : केंद्र शासनाने नुकतेच पारित केलेल्या कृषी विधयकांचे समर्थन करण्यासाठी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता.२) महात्मा गांधी पुतळा वजिराबाद येथे ‘समर्थन व संपूर्ण स्वातंत्र्य’ आंदोलन करण्यात आले. प्रशासनाला दिलेल्या निवेनदनानंतर समर्थन रॅलीची सांगता झाली.  

केंद्र शासनाने संसदेत संमत केलेल्या कृषी विधेयकांना शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. शेतकरी संटघनेच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ खुली होत आहे. हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल व्यापाराचे स्वातंत्र्य सरकार देत आहे. परंतु, आवश्यक वस्तू कायद्यातून वगळलेल्या वस्तू, भाववाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या विधेयकातील तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध आहे. या तरतुदीमुळे शेतीमाल व्यापारावर अनिश्चिततेची टांगती तलवार राहील.

या तरतुदीमुळे शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार व गुंतवणूकदार सर्वांचाच तोटा आहे. कायदा तयार करताना सरकारने ही दुरूस्ती करावी, अशी शेतकरी संघटनेने यावेळी मागणी केली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या दिवशी शेतकरी त्यांच्या पुतळासमोर चिंतन प्रबोधन करण्यात आले. संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे, ॲड. धोंडिबा पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

परभणीत आंदोलनाद्वारे समर्थन

 केंद्र शासनाने संमत केलेल्या कृषी विधेयकांच्या समर्थणार्थ, या विधयेकांतील त्रुटी सुधारून शेतकऱ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२) परभणी येथील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर ‘समर्थन व संपूर्ण स्वातंत्र्य’ आंदोलन करण्यात आले.  

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, उद्धवराव जवंजाळ, संतोष गबाळे, गणेश पवार, माधवराव शिंदे, हनुमान आमले, रामेश्वर बारवकर, रामकिशन भाबट, रफिक पटेल, माधव खरात, मोहनसीन, अफसर पठाण, कल्याण माने आदींनी निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com