Agriculture news in marathi The ‘sweetness’ of sugar exports increased | Agrowon

साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढला

राजकुमार चौगुले
मंगळवार, 13 एप्रिल 2021

केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर होण्यास झालेला विलंब, कंटेनर, जहाजांची अनुपलब्धता अशा अनेक अडचणी येऊन सुद्धा यंदा साखर निर्यात कराराने वेग घेतला आहे. जानेवारी ते मार्च या केवळ तीन महिन्यांत तब्बल ४६ लाख टनांचे साखर निर्यात करार झाले आहेत.

कोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर होण्यास झालेला विलंब, कंटेनर, जहाजांची अनुपलब्धता अशा अनेक अडचणी येऊन सुद्धा यंदा साखर निर्यात कराराने वेग घेतला आहे. जानेवारी ते मार्च या केवळ तीन महिन्यांत तब्बल ४६ लाख टनांचे साखर निर्यात करार झाले आहेत. यातील २२ लाख टनांपर्यंतची साखर प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. प्रत्येक महिन्याला साधारणत: सात लाख टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात होत आहे. 

गेल्या हंगामातही देशातील साखर कारखान्यांनी ५० लाख टन उद्दिष्टापैकी ४८ लाख टनांपर्यंतची निर्यात केली होती. यंदा उच्चांकी साखर उत्पादन अपेक्षित असल्याने केंद्राने साखर निर्यात धोरण तातडीने जाहीर करावी, अशी मागणी साखर उद्योगाने यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी केली होती. परंतू २९ डिसेंबर २०२० ला निर्यात धोरण जाहीर केले. यंदा साठ लाख टनांचे उद्दिष्ट दिले. पहिले तीन महिने वाया गेल्याने यंदा कितपत साखर निर्यात होईल याबाबत साशंकता होती. धोरण जाहीर झाल्यानंतर कारखान्यांनी गतीने साखर निर्यात करण्यास प्राधान्य दिले. धोरणात लवचिकपणा आणताना केंद्राने स्थानिक व निर्यात कोट्याची कारखान्यांनी एकमेकांत अदलाबदल करण्याची मुभा दिली. याचा फायदा महाराष्टासारख्या राज्यांना झाला. याचा फायदा होवून पाच लाख टनांपेक्षा अधिक साखरेची निर्यात झाली. 

सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तरीही कारखान्यांनी उत्पादित झालेली साखर निर्यात करण्याचे करार वेगात सुरू ठेवले आहेत. यामुळे उशिरा निर्णय होवूनही निर्यातीला कारखान्यांची पसंती मिळत असल्याचे चित्र एप्रिल महिन्यात आहे. इराण सारख्या देशाबरोबर निर्यातीसाठी बोलणी सुरू आहे. यंदा चलन साठ्याच्या प्रश्नामुळे निर्यात बंद आहे. गेल्या वर्षी एकट्या इराण ने ११ लाख टन साखर निर्यात केली होती. यंदा ही बोलणी यशस्वी झाल्यास निर्यात करारात आणखी वाढ होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले. 

प्रतिकूल परिस्थितीतही साखर निर्यातीसाठीचा वेग समाधानकारक म्हणावा लागेल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रतिकूल परिस्थिती असतानाही कारखाने निर्यातीला प्राधान्य देत आहेत. जागतिक बाजारात यामुळे भारताचे नाव उंचावणार आहे. 
- अभिजित घोरपडे, 
साखर निर्यातदार 


इतर अॅग्रो विशेष
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....