Agriculture news in marathi ‘Taukte’ to the victims 25 crore aid distribution | Agrowon

‘तौक्ते’ नुकसानग्रस्तांना २५ कोटींच्या मदतीचे वितरण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे ४५ कोटी ४९ लाख ३३ हजार रुपये प्राप्त झाले. 

सिंधुदुर्गनगरी : तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे ४५ कोटी ४९ लाख ३३ हजार रुपये प्राप्त झाले. त्यापैकी आतापर्यंत २५ कोटी १९ लाख ५८ हजार ६६८ रुपयांचे वितरण आपद्ग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. सुरूवातीला स्थावर मालमत्ता भरपाईची रक्कम अदा केली जात आहे. त्यानंतर शेती, बागायतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

१६ मे रोजी जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. कोकणात सर्वाधिक नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले. हजारो घरे, इमारतीची पडझड झाली. शेती, बागायतीचे कोट्यावधीचे नुकसान झाले. या शिवाय महावितरण व अन्य शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे.शासनाने घरे, गोठे, अन्य इमारती आणि शेती, बागायतीच्या नुकसानीसाठी ४५ कोटी ४९ लाख ३३ हजार रुपये जाहीर केले. ही रक्कम शासनाने जूनमध्ये जिल्हा प्रशासनाकडे पाठविली. 

तत्पूर्वीच जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या बँक खाते क्रमांक आणि इतर कागदपत्रे घेतली होती. त्यामुळे निधी प्राप्त झाल्यानंतर हा निधी तालुकानिहाय पाठविण्यात आला.सध्या तहसीलदार कार्यालयाकडून निधी वितरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत २५ कोटी १९ लाख ५८ हजार ६६८ रुपये इतकी रक्कम नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. ५५ टक्के वितरण झाले असून, उर्वरित ४५ टक्के रक्कम वितरणाची प्रकिया 
सुरू आहे. 

घर, गोठ्यांसह अन्य इमारतीच्या नुकसानीची रक्कम पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आली आहे. आता शेती आणि बागायतीच्या नुकसानीची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे. येत्या दहा पंधरा दिवसांत बहुतांशी निधीचे पूर्ण वितरण होईल, अशी शक्यता आहे.

तालुकानिहाय प्राप्त 
भरपाईची रक्कम    

  • दोडामार्ग    ९६ लाख ९५ हजार ६०० रुपये
  • सावंतवाडी    ५ कोटी ४५ लाख ५ हजार ७०० रुपये
  • वेंगुर्ला    ८ कोटी ९ लाख ३०० रुपये
  • कुडाळ     ७ कोटी २८ लाख ५ हजार २०० रुपये
  • मालवण    ११ कोटी ८८ लाख ९ हजार रुपये
  • कणकवली    २ कोटी ३५ लाख ४५ हजार रुपये
  • देवगड    ७ कोटी ३३ लाख ८ ७हजार ८०० रुपये
  • वैभववाडी    २ कोटी ४८ लाख ७५ हजार रुपये
     

इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...