कृषी व्यवसाय प्रकल्पा’साठी पाच हजार अर्ज दाखल

राज्यातील ग्रामीण भागात मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ११ हजार ५९४ संस्थांनी नोंदणी केली असून, ५ हजार ७६४ संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
‘परिवर्तन प्रकल्पा’साठी  पाच हजार अर्ज दाखल For the ‘Transformation Project’  Five thousand applications filed
‘परिवर्तन प्रकल्पा’साठी  पाच हजार अर्ज दाखल For the ‘Transformation Project’ Five thousand applications filed

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ११ हजार ५९४ संस्थांनी नोंदणी केली असून, ५ हजार ७६४ संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात २९ पथदर्शी उपप्रकल्पांची अंमलबजावणी सुरू असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तर तासात लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

या संदर्भात सदस्य सुरेश वरपुडकर, अमीन पटेल, सुलभा खोडके आदींनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना कृषिमंत्री भुसे यांनी म्हटले आहे, ‘‘या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उत्पादक कंपन्या, गटांमार्फत संघटित करून गटशेतीवर भर देणे व त्याद्वारे शेतमालाचे संकलन करून शेतकऱ्यांना थेट प्रक्रियादार व निर्यातदारांशी जोडण्यात येईल. 

राज्यातील सर्व प्रमुख पिकांसाठी स्पर्धात्मक व सर्व समावेशक मूल्य साखळ्या विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने २१०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. सप्टेंबर २०२०मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले असून, या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी संस्था व खरेदीदारांना ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. सन २०२०-२१ साठी प्रकल्पाकरिता १०.६६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com