दहा जानेवारीला ‘उजनी’तून सोडणार रब्बीसाठी पाणी

सोलापूर : उजनी धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. आता रब्बी आणि उन्हाळी पाळ्यांचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. त्यानुसार रब्बी हंगामासाठी येत्या १० जानेवारीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.
From ‘Ujani’ on January 10th Water for the rabbi to leave
From ‘Ujani’ on January 10th Water for the rabbi to leave

सोलापूर : उजनी धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. आता रब्बी आणि उन्हाळी पाळ्यांचे  नियोजनही प्रशासनाने केले आहे. त्यानुसार रब्बी हंगामासाठी येत्या १० जानेवारीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, कालवा सल्लागार समितीची बैठक डिसेंबरअखेर होणार आहे. त्यावर याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

उजनी धरणातून यंदा रब्बी हंगामासाठी एक आणि उन्हाळ्यासाठी दोन पाणी पाळ्या देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ३ लाख ५० हजार ८१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.  त्यात ३८ हजार ८०३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. मक्याची ३४ हजार २५८ हेक्टर क्षेत्र आहे. त्याशिवाय ४७ हजार २३५ हेक्टरवर तृणधान्यांची लागवड आहे. त्याशिवाय ऊसही दीड लाख एकरवर आहे. या सर्व पिकांना पाण्याची आवश्यकता असणार आहे. 

यंदा पाऊस बऱ्यापैकी झाल्याने उजनी धरणातही ११० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. त्यापैकी ५८.९४ टीएमसी उपयुक्त साठा आहे. या पाण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यानुसारच १० जानेवारीला रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com