‘उजनी’ शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर

उजनी धरणाकडे वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरुच असल्याने धरण अखेर शंभर टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोचले आहे. सोमवारी (ता. ४) धरणाची पाणी पातळी ९७.१३ टक्क्यांवर होती.
‘Ujani’ on the threshold of one hundred percent
‘Ujani’ on the threshold of one hundred percent

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाकडे वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरुच असल्याने धरण अखेर शंभर टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोचले आहे. सोमवारी (ता. ४) धरणाची पाणी पातळी ९७.१३ टक्क्यांवर होती. मंगळवारपर्यंत धरण शंभर टक्केचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता आहे.

यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने जेमतेम हजेरी लावली. ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. पण धरणातील पाणी पातळी वाढू शकली नाही. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र सर्वाधिक पाऊस झाला. गेल्या चार महिन्यांतील पावसाची सरासरी या पावसाने गाठली. 

उजनी धरणात पुणे जिल्ह्याकडील धरणांतून पाणी येते. तिकडेही काहीशी अशीच परिस्थिती होती. पण आता पुणे जिल्ह्याकडील धरणातही पुरेसा पाणीसाठा झाल्याने तिकडून अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडले जात आहे. बंडगार्डनकडून सोमवारी ४ हजार १६४ क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. शिवाय गेल्या पंधरवड्यापासून त्यात सातत्य आहे. या विसर्गातही कमी-जास्त प्रमाण होते आहे. पण अखंडपणे सुरू असलेल्या प्रवाहामुळे धरणातील पाणी साठा वाढला आहे. 

सोमवारी (ता. ४) ९७.१३ टक्केपर्यंत तो पोचला. गेल्यावर्षीच्या तुलनेत तो काहीसा कमी आहे. गेल्यावर्षी धरणात याचदिवशी १०९.३३ टक्क्यापर्यंत पाणी पातळी होती. असे असले तरी यंदा उशिरा का होईना, धरण शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर पोचल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

 धरणातील पाणीसाठा उजनी धरणामध्ये सोमवारी एकूण पाणीपातळी ४९६.६५० मीटर होती. तर एकूण पाणीसाठा ११५.१२ टीएमसी तर त्यापैकी उपयुक्त साठा ५१.४६ टीएमसी होता. तर या पाण्याची टक्केवारी ९७.१३ टक्के इतकी होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com