Agriculture news in marathi ‘Use home-grown soybean seeds in kharif’ | Page 3 ||| Agrowon

‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 एप्रिल 2021

सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे  घरचे बियाणे वापरणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार असल्याचे मत  कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी व्यक्त केले.

सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे  घरचे बियाणे वापरणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार असल्याचे मत  कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी व्यक्त केले.

 नागठाणे येथे सोयाबीन बियाणे अंकुरण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक प्रसंगी बोलत होते. या वेळी प्रगतशील  शेतकरी सुनील नारायण साळुंखे, राम साळुंखे उपस्थित होते.

 सोनावले म्हणाले, ‘‘सध्या सोयाबीनचे दर वाढले आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी स्वतःसाठी सुद्धा बियाणे न ठेवता संपूर्ण सोयाबीनची बाजारात विक्री करीत आहेत. त्यामुळे आज तत्कालीन फायदा दिसत असला तरी खरीप हंगामात त्याचा तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो. 

खुल्या बाजारात  सोयाबीनची विक्रमी दर वाढ झाल्यामुळे या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाणे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. 
काही वेळेस चांगले बियाणे मिळणे कठीण होऊ शकते. खरीप हंगामातील अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी मिळेल ते बियाणे घेऊन पेरणी करतात आणि त्याचा उगवण क्षमता व पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. 

ज्यांच्याकडे फुले संगम, फुले किमया, डी एस -२२८, फुले अग्रणी,  जे एस ३३५ या वाणाचे चांगले प्रतीचे सोयाबीन आहे. ’’

शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा

या वर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, युवराज काटे, रोहिदास तिटकारे यांच्या मार्गदर्शनातून  उन्हाळी हंगामातील सोयाबीनची जी  प्रात्यक्षिके  घेतली आहेत. त्याची काढणी झाल्यानंतर एक आठवड्यांनंतर या पद्धतीने अंकुरण क्षमता तपासणी करून योग्य ते सोयाबीन बियाणे म्हणून शेतकरी गट, कंपनीमार्फत  विकल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...
नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अधिक पर्जन्य...
अकोला जिल्ह्यातील २६ मंडलांत अतिवृष्टीअकोला ः गेल्या २४ तासांत वऱ्हाडात प्रामुख्याने...
अकोल्याच्या पश्चिमेकडे जोरदार पावसाची... नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील...
दुग्धविकास मंत्रालय बड्या नेत्यांच्या...नगर ः दुधाचे दर आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांबाबतचे...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात घेवडा १५०० ते ६५०० रुपयेसांगलीत प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये...