agriculture news in marathi ‘Vaccine on call’ method District-wide implementation: Bharne | Agrowon

‘वॅक्सिन ऑन कॉल’ पद्धती जिल्हाभर राबवा ः भरणे

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

सोलापूर ः ‘‘सोयी-सुविधा, लसीकरणाचे नियोजन करून ‘वॅक्सिन ऑन कॉल’ पद्धती जिल्हाभर राबवाव्यात,’’ अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केल्या.

सोलापूर ः ‘‘जिल्ह्याला कोविड लस, रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा इतर जिल्ह्यांपेक्षा सुरळीत होत आहे.  लसीव्यतिरिक्त कोणताही तुटवडा नाही. लसीकरणाच्या बाबतीत सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या केंद्राप्रमाणे सोयी-सुविधा, लसीकरणाचे नियोजन करून ‘वॅक्सिन ऑन कॉल’ पद्धती जिल्हाभर राबवाव्यात,’’ अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केल्या.

जिल्ह्यातील कोविड-१९ आढावा बैठकीत भरणे बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयाचे डॉ. प्रसाद उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ‘‘आयुर्वेदिक महाविद्यालयातील लसीकरण केंद्र आदर्श आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना एकत्र आल्यानंतर काय घडू शकते, याचे हे उदाहरण आहे. लसीकरण कक्ष, डाटा एन्ट्री, नोंदणी विभाग, पाणी, रुग्णांना बसण्याची व्यवस्था आणि येणाऱ्या रुग्णांसाठी सुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन या ठिकाणी होत आहे.’’ 

‘‘नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस नियोजनानुसार दिला जातोय. ज्यांचा दुसरा डोस असेल, त्यांना फोनद्वारे बोलावून घेतले जात आहे. यामुळे गर्दी टाळली आहे. या प्रकारे जिल्हाभर नियोजन करा. दररोजच्या लसीकरणाची क्षमता वाढवा,’’ अशा सूचना भरणे यांनी केल्या.

शंभरकर म्हणाले, ‘‘ऑक्सिजनचा जिल्ह्यात तुटवडा नाही. तीन प्लान्ट खासगी दवाखान्यात सुरू होत आहेत. सिव्हिल हॉस्पिटल ‘ए’ आणि ‘बी’ ब्लॉक येथे प्लान्ट बसविण्यात येणार आहे. त्यामधून ४५० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होणार आहेत.’’ शहरबाबतच्या स्थितीचे शिवशंकर, ग्रामीण डॉ. जाधव यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

...तर त्या दवाखान्यावर कारवाई

‘‘तिसऱ्या लाटेची शक्यता धरून ऑक्सिजन, बेड उपलब्धता, कोविड केअर सेंटरची व्यवस्था करा. खासगी दवाखान्यात बेड शिल्लक असताना डॅशबोर्डवर दाखवीत नाहीत. टीमद्वारे  तपासणी करून अशा दवाखान्यावर कारवाई करा’’, असेही भरणे म्हणाले.


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...