‘विकेल ते पिकेल’मध्ये गहू, बाजरी समाविष्ट करा

जळगाव ः कोरोनाचे संकट जसे वाढत आहे, तसा शेतमालाच्या दरांवरील दबावही वाढू लागला आहे. यामुळे शेतमालास फटका बसू लागला आहे.
In ‘Vikel te Pickel’ Include wheat, millet
In ‘Vikel te Pickel’ Include wheat, millet

जळगाव ः कोरोनाचे संकट जसे वाढत आहे, तसा शेतमालाच्या दरांवरील दबावही वाढू लागला आहे. यामुळे शेतमालास फटका बसू लागला आहे. बाजरी, गव्हाच्या दरांवर दबाव वाढत आहे. ही बाब लक्षात घेता ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेतून गहू, बाजरी विक्रीसाठी शेतकऱ्यांना शहरांमध्ये जागा, स्टॉल द्या, अशी अशी मागणी केली जात आहे. 

विकेल ते पिकेल संकल्पनेतून दादर ज्वारी, भरीताची वांगी यांची विक्री करण्यास प्रोत्साहन दिले आहे. या अंतर्गत जळगाव, भुसावळात स्टॉलही सुरू झाले आहेत. परंतु आता गहू, बाजरी यांची आवकही सुरू होत आहे. जिल्ह्यात खपली, बन्सी व इतर चांगल्या वाणांच्या गव्हाची पेरणीदेखील शेतकऱ्यांनी केली आहे. यांना चांगली मागणी असते, परंतु ग्राहकांपर्यंत ते व्यवस्थितपणे पोचण्याची आवश्यकता आहे.

ही बाब लक्षात घेता या संकल्पनेत बाजरी, गव्हाचा समावेश करायला हवा. स्टॉल उभारण्यासाठी संबंधित शहरांच्या पालिकांशी कृषी विभागाने चर्चा करायला हवी, अशी मागणी होत आहे.

जळगावात शेतकरी बाजाराची मागणी गेले अनेक वर्षे केली जात आहे. परंतु हा बाजार सुरूच झाला नाही. कोरोनाचे संकट वाढत असल्याने हा बाजार याच महिन्यात सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी काव्यरत्नावली चौक, महाराणा प्रताप पुतळा परिसराला शेतकऱ्यांची सहमती आहे. 

चाळीसगाव, भुसावळमध्येही मागणी

शेतकरी बाजारांची गरज चाळीसगाव, भुसावळ, यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, अमळनेर येथेही आहे. या भागातही याबाबत कृषी विभागाने चर्चा करावी व पुढील कार्यवाही करावी. गेल्या वर्षी कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीचे स्टॉल सुरू केले होते, परंतु पालिकेने या स्टॉलवर कारवाई करून विक्री अनेक भागात बंद केली होती. हा प्रकार यंदा व्हायला नको, अशी मागणीदेखील शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com