मराठवाड्यात ०.८७ टक्‍केच उपयुक्‍त पाणी

मराठवाड्यात ०.८७ टक्‍केच उपयुक्‍त पाणी
मराठवाड्यात ०.८७ टक्‍केच उपयुक्‍त पाणी

औरंगाबाद : अजूनही पुरेसा पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. शुक्रवार (ता. २६) अखेरपर्यंत या प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ०.८७ टक्‍क्‍यांवरच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ०.३९ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांत २.८२ टक्‍के, ७४९ लघू प्रकल्पांत १.४१ टक्‍के, तर गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमध्ये केवळ ०.१० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 

तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमध्ये, २७ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील ८, उस्मानाबादमधील १७, तर परभणी जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत सर्वाधिक २१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ३ टक्‍के, नांदेड जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पांत केवळ २ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे.

मराठवाड्यातील २११ लघू प्रकल्पांत उपयुक्‍त पाणी नाही. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील ५७, लातूरमधील १३२, परभणीमधील २२ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत ३ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत १ टक्‍के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत १ टक्‍का, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ४ टक्‍के, तर हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत केवळ १ टक्‍काच उपयुक्‍त पाणी आहे. गत तीन वर्षांतील तुलनेत यंदाचा २६ जुलैअखेरचा पाणीसाठा सर्वांत कमी आहे. 

मराठवाड्यातील ८२४ लघू, मध्यम प्रकल्पांपैकी ३४६ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये ३२ मध्यम प्रकल्पांसह ३१४ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २८, जालन्यातील १५, बीडमधील २३, लातूर ७७, उस्मानाबाद ५८, नांदेड ६८, परभणी २१, तर हिंगोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबादमधील ५, जालन्यातील ४, बीड, लातूरमधील प्रत्येकी ७, उस्मानाबाद व परभणीमधील प्रत्येकी २, तर नांदेडमधील ५ मध्यम प्रकल्पांचीही हीच स्थिती आहे. 

अजूनही ३९८ प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील ७५ मध्यम व ७४९ लघू प्रकल्पांपैकी ३९८ प्रकल्पांत अजूनही पाणी नाही. त्यात ३३ मध्यम व ३६६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबादमधील ८, जालना, लातूरमधील प्रत्येकी १, तर बीडमधील ८, उस्मानाबादमधील १५ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com