औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरमध्ये १ लाख १७ हजार क्विंटलवर हरभऱ्याची खरेदी

औरंगाबाद : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी शुक्रवारी (ता.२२) भाजपतर्फे महाआघाडी सरकारच्या विरोधात ‘माझे अंगण हेच रणांगण' आंदोलन करण्यात आले.
1 lakh 17,000 quintals Purchase of gram at in Aurangabad, Osmanabad, Latur
1 lakh 17,000 quintals Purchase of gram at in Aurangabad, Osmanabad, Latur

औरंगाबाद : औरंगाबाद, उस्मानाबाद व लातूर या तीन जिल्ह्यांत ३३ केंद्रांवरून २० मेपर्यंत १ लाख १७ हजार ४९६ क्विंटल हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यात आली आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी सहा केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या सहा केंद्रांवर २० मेपर्यंत ८२३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ७१६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठवण्यात आले. यांपैकी ४१९ शेतकऱ्यांकडील ४१६३ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी १४ केंद्रांना मंजुरी देण्यात आली.

या केंद्रांवर २० मेपर्यंत १९ हजार ६७१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी ४ हजार २८७ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी २६०८ शेतकऱ्यांकडील ३२ हजार १७४ क्विंटल ६३ किलो हरभरा खरेदी करण्यात आला. 

लातूर जिल्ह्यात हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यासाठी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. केंद्रांवर ३४ हजार ६३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी ५८५५ शेतकऱ्यांकडील ८० हजार ८५९ क्विंटल ३० किलो हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यात आली. ३९ कोटी ४१ लाख ८९ हजार ८७ रुपयांच्या खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी ४९ हजार १४७ क्विंटल हरभरा गोडाऊनमध्ये साठविण्यात आला. तर, ३१ हजार ७१२ क्विंटल हरभरा गोडाउनमध्ये साठविणे बाकी होते. खरेदी केलेल्या हरभऱ्याच्या चुकाऱ्याचा प्रश्न कायम आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com