हिंगोलीत शेतकरी सन्मान निधी योजनेचे १ लाख ३३ हजार लाभार्थी

हिंगोलीत शेतकरी सन्मान निधी योजनेचे १ लाख ३३ हजार लाभार्थी
हिंगोलीत शेतकरी सन्मान निधी योजनेचे १ लाख ३३ हजार लाभार्थी

हिंगोली ः शेतकरी कुटुंबांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अत्यंत महत्त्वाची असून जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये एवढी रक्कम तीन हप्त्यामध्ये दिली जाणार आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा रविवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित झाला. या वेळी श्री. जयवंशी बोलत होते.

या वेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, कृषी उपसंचालक एस. व्ही. लाडके, उपविभागीय कृषी अधिकारी बळीराम कच्छवे, तहसीलदार गजानन शिंदे, तालुका कृषी अधिकारी सतिश सावंत, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्री. जयवंशी म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात १ लाख ३३ हजार २६७ पात्र लाभार्थी आहेत. त्यापैकी १ लाख १७ हजार ३३४ पात्र लाभार्थ्यांची नावे वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची नावे लवकरच अपलोड करण्यात येतील. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या राशीतून शेतकरी शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, अवजारे इत्यादी खरेदी करू शकतील. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचे निराकरण करण्यास प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या वेळी जिल्ह्यातील १० लाभार्थ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात उपविभागीय कृषी अधिकारी बळिराम कच्छवे यांनी या योजनेसाठी लागणारी लाभार्थींची पात्रता, स्थापन केलेल्या समित्या, पात्र यादी इत्यादी विषयी पॉवर पॉईंट प्रझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com