Agriculture news in marathi 1 lakh in Akola circle 32 thousand paid by 84 thousand customers | Page 2 ||| Agrowon

अकोला परिमंडळातील १ लाख  ८४ हजार ग्राहकांनी भरले ३२ कोटी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 4 एप्रिल 2021

कोरोनाच्या काळात शासन निर्देशानुसार अंतराचे नियम पाळत अकोला परिमंडळातील १.८४ लाख  वीजग्राहकांनी महावितरणचे सुमारे ३२ कोटी रुपये भरले आहेत. 

अकोला : कोरोनाच्या काळात शासन निर्देशानुसार अंतराचे नियम पाळत अकोला परिमंडळातील १.८४ लाख  वीजग्राहकांनी महावितरणचे सुमारे ३२ कोटी रुपये भरले आहेत. 

सद्यःस्थितीत अकोला परिमंडळातील १.८४ लाख ग्राहक दरमहा सरासरी ३२.०३ कोटी रुपयाचा ऑनलाइनद्वारे वीजबिल भरणा करतात. महावितरणच्या प्रादेशिक विभागानुसार नागपूर प्रादेशिक विभागात १० लाख ८८ हजार ग्राहक १८९ कोटी ६४ लाख रुपयांचा, कोकण प्रादेशिक विभागात ३० लाख ५४ हजार वीजग्राहक दरमहा सरासरी ६९५ कोटी रुपयांचा तर पुणे प्रादेशिक विभागातील १८ लाख ७१ हजार ग्राहक ४२५ कोटी ८० लाख रुपयांचा आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात ५ लाख ९४ हजार वीजग्राहक १०५ कोटी ४२ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहे. 

 महावितरणची वेबसाइट व मोबाइल ॲप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करता येतो. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे.

लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाइन’ बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकिंग, मोबाइल वॉलेट, मोबाइल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट दिली जात असल्याने ग्राहक या सुविधेला पसंती देत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...