सांगलीतील खरेदी केंद्रावर १ हजार २५६ शेतकऱ्यांकडून तूर विक्री

जिल्ह्यातील केंद्रावर १ हजार २५६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. १७२ शेतकऱ्यांचे ५१ लाख ७० हजार ७०० रुपये वर्ग केले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच वर्ग होईल. शासनाच्या नियमानुसार खरेदी केंद्र सुरु आहे. - दिलीप पाटील,जिल्हा पणन अधिकारी, सांगली.
1 thousand 256 farmers Sales of tur at the shopping center in Sangli
1 thousand 256 farmers Sales of tur at the shopping center in Sangli

सांगली : येथील बाजार समितीतील शासनाचे तूर खरेदी केंद्र सुरु आहे. सोमवार (ता. २७) अखेर २५८ शेतकऱ्यांनी १ हजार २५६ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. तुरीला ५ हजार ८०० रुपये हमीभाव आहे. १७२ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ५१ लाख ७० हजार ७०० रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील तुरीचा पेरा जत तालुक्‍यात सर्वाधिक असतो. त्यानंतर आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यात कमी अधिक क्षेत्रावर तूर पीक घेतले जाते. यंदा शासनाने तुरीला ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सांगली बाजार समितीत विष्णूअण्णा खरेदी-केंद्र सुरु केले आहे.

तूर विक्रीसाठी जिल्ह्यातील ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आज अखेर २५७ शेतकऱ्यांनी १ हजार २५६ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. त्याची हमीभावानुसार ७२ लाख ८४ हजार ८०० रुपये इतकी रक्कम होते. त्यांपैकी १७२ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ती वर्ग केली आहे. उर्वरित ८६ शेतकऱ्यांची रक्कम येत्या चार ते पाच दिवसांत वर्ग होईल. 

दरम्यान, ४४२ शेतकऱ्यांनी तूर विक्री केलेली नाही. या शेतकऱ्यांना मोबाइलवरून तूर विक्रीस यावे, असे संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार शेतकरी तूर विक्रीसाठी येतील.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com