Agriculture news in marathi, 1 thousand 750 farmers benefit from sprinkler irrigation in Wardha district | Page 2 ||| Agrowon

वर्धा जिल्ह्यात तुषार सिंचनाचा १ हजार ७५० शेतकऱ्यांना लाभ

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

वर्धा ः ‘‘नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ७५० शेतकऱ्यांना सिंचनासाठी तुषार सिंचन संचाचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रणालीव्दारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ३ कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.

वर्धा ः ‘‘नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ७५० शेतकऱ्यांना सिंचनासाठी तुषार सिंचन संचाचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रणालीव्दारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ३ कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. सिंचनासाठी तुषार सिंचन ही किफायतशीर आणि शेतकऱ्यांची मागणी असलेली सिंचन पद्धती आहे.  जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ द्यावेत’’, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, तर जिल्ह्यातील उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी तुषार सिंचन ही अतिशय उपयुक्त योजना आहे. शेतकऱ्यांकडून या योजनेचे मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तुषार सिंचन संचाचा लाभ दिला जातो. तुषार संचाव्दारे कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळवता येते.

योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अल्प, अत्यल्प, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला लाभार्थ्यांना ५५ टक्के, तर उर्वरित शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७५० शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांना देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम ३ कोटी इतकी आहे. तालुका निहाय लाभ दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये आर्वी तालुका १५९ शेतकरी, आष्टी ११६, देवळी २५४, हिंगणघाट १५५, कारंजा ५०, समुद्रपूर २४४, सेलू ४४६, तर वर्धा तालुक्यातील ३२६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

१३४ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन

फळपिकांसाठी ठिबक सिंचन उपयुक्त आहे. या सिंचनाव्दारे फळ, झाडांना पाणी दिल्यास अतिशय कमी पाण्यात ओलित होऊन पिकांची वाढ होते. उत्पादनही चांगले मिळते. त्यामुळे फळपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत ठिबक सिंचन संचाचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात १४५ फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी ९४ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले.


इतर बातम्या
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...
सोयापेंडच्या सामान्य मागणीमुळे सोयाबीन...बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळी भोवती फिरत...
वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या बैठकीचा बार...वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)...
जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा मजबूत...पुणे - २०२२ मध्ये जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा (...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
...तर गावांना मिळणार ५० लाख पुणे - भारतासह जगात गेल्या दोन वर्षांपासून...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...