चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक

महावितरण विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे ही आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई द्यावी. - तुषार खरात, शेतकरी, चांदोरी, ता. निफाड महावितरणने पावसाळ्या पूर्वी चांदोरी शिवारातील खाली आलेल्या तारांचा प्रश्न निकाली काढावा. अन्यथा, अशी परिस्थिती इतरत्रही निर्माण होऊ शकते. - शिरीष गडाख, उपसरपंच, चांदोरी ग्रामपालिका
10 acres of sugarcane destroyed due to short circuit in Chandori
10 acres of sugarcane destroyed due to short circuit in Chandori

चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी गावातील सुकेणा रोड भागात उसाच्या क्षेत्रावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. काही ठिकाणी या तारा हाताच्या उंचीप्रमाणे आहेत. त्यात घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. आगीत सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एकीकडे कोरोनामुळे अडचण असताना महावितरणच्या दुर्लक्षामुळे वीजवाहक तारांचे घर्षण होऊन उसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. 

चांदोरी येथील सुकेणा रस्त्यावर संपत आहेर यांची गट नं. ८६५ अडीच बिघे, निवृत्ती आहेर गट नं.८६६ तीन बिघे, इंदूबाई गडाख गट नं.८५५ तीन बिघे, पुष्कर भन्साळी गट नं.८७३ चार बिघे, पंकज भास्कर गडाख गट नं.१०२२ दीड एकर या शेतकऱ्यांचा ऊस व तुषार खरात यांची एक एकर द्राक्ष बाग आहे. या क्षेत्रात आग लागली. वाऱ्यामुळे ती पसरली; मात्र ही घटना तात्काळ लक्षात आल्याने शेतकरी व नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे बाजूचे उसाचे क्षेत्र वाचले. 

या घटनेचा गुरुवारी (ता.२८) तलाठी निखिल शिरोडे यांनी व महावितरणच्या पथकाने पंचनामा केला. यासह सायखेडा पोलिसांकडे याबाबत कळविले आहे. नुकसनीपोटी भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  लॉकडाऊनचा फटका 

जळालेल्या १० एकर क्षेत्रापैकी ८ एकरवरील ऊस तोडणीला आला होता. लॉकडाऊन असल्याने रसवंती बंद होती. दुसऱ्या दिवशी त्या उसाची तोडणी चालू करायची होती. त्यापूर्वीच शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला. तुषार खरात यांची लॉकडाऊनमुळे प्रतिकिलो ५ रुपयांप्रमाणे द्राक्ष देऊन नुकसान झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com