agriculture news in Marathi 10 crore turnover in silk market in state Maharashtra | Agrowon

राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची उलाढाल

विनोद इंगोले
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. राज्यातील तीन बाजारपेठांच्या माध्यमातून १० कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या ३२३.५२२ टन कोषांची खरेदी झाली आहे. रेशीमकोष उत्पादकांना किलोमागे ५० रुपयांचे अनुदान मिळत असल्यानेदेखील शासकीय बाजारातच कोषविक्रीवर उत्पादकांचा भर वाढला आहे. 

नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. राज्यातील तीन बाजारपेठांच्या माध्यमातून १० कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या ३२३.५२२ टन कोषांची खरेदी झाली आहे. रेशीमकोष उत्पादकांना किलोमागे ५० रुपयांचे अनुदान मिळत असल्यानेदेखील शासकीय बाजारातच कोषविक्रीवर उत्पादकांचा भर वाढला आहे. 

राज्यात रेशीम कोष विक्रीचा पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगर बाजारातच विक्रीसाठी जावे लागत होते. राज्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाषेचा मोठा अडसर होत असल्याने त्या माध्यमातून त्यांच्या लुटीचे प्रकारही वाढीस लागले होते. त्यामुळे राज्यात कोष विक्रीचा पर्याय असावा, अशी मागणी होत होती. रेशीम संचालनालयाने त्याची दखल घेत पहिल्या टप्प्यात जालना, बारामती, पूर्णा (परभणी) अशा तीन ठिकाणी रेशीम कोष बाजार उभारले आहेत. 

बाजारात गेल्या आठ महिन्यांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये जालना बाजारात ३ हजार ७७ शेतकऱ्यांकडून २४७ टन कोष विक्री करण्यात आली. या माध्यमातून ८ कोटी १२ लाख ४० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पूर्णा रेशीम बाजारात १५९ शेतकऱ्यांनी १३.०८१ टन कोष विकून ४८.९८ लाख रुपये कमविले.

बारामती बाजारात ६२.५७१ टन कोषाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. राज्यातील एकूण खरेदी ३२३.५२२ टन तर १० कोटी ६४ लाख ६५ हजार रुपयांची उलाढाल आहे. राज्यात तीनही रेशीम बाजारांना रेशीम कोश उत्पादकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आठवडाभरापूर्वी पाचोड (पैठण) येथे रेशीम कोश बाजाराची सुरुवात करण्यात आली. 

किलोमागे ५० रुपयांचे अनुदान
राज्याच्या काही भागांत रेशीमकोषाला किलोमागे अनुदान देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. त्याच धोरणाचा अवलंब महाराष्ट्रात करण्यात आला असून, किलोमागे ५० रुपये अनुदान दिले जात आहे. त्यामुळेदेखील स्थानिक बाजारात रेशीमकोष विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढीस लागला आहे. या व्यवहारात पारदर्शकता राहावी, याकरिता खरेदी-विक्रीची सारी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.


इतर अॅग्रोमनी
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...