फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १० टक्के वाढ

फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १० टक्के वाढ
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १० टक्के वाढ

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली. फ्लॉवर, पापडी, घेवडा, शेवगा यांची आवक मंदावल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.  

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, हिमाचलप्रदेशातून सुमारे ५ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमीळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी, तर इंदौर येथून गाजराची सुमारे ५ टेम्पो आवक झाली. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटो सुमारे ४ हजार क्रेट, फ्लॉवर, कोबी, काकडी, ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, गावरान कैरी सुमारे ८ टेम्पो, तसेच कांदा सुमारे १०० ट्रक, तर स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा - १२०-१५०, बटाटा- ९०-१५०, लसूण - ४००-८००, आले : सातारी ७००-८००, भेंडी : ३००-३५०, गवार : २५०-४००, टोमॅटो - १८०-२००, दोडका : ३५०-३००, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : १५०-१८०, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी २५०-३००, पापडी : ५०० -६००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : १८०-२००, कोबी : १२०-१५०, वांगी : २०० -३००, डिंगरी : १६० -१८०, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३५०, जाड : १५०, शेवगा : ५००, गाजर : १६०-१८० वालवर : ३००-३५०, बीट : १४०-१६०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १८० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ३०० -३५०, पावटा : ७०० -८००, मटार : ७००-८००, तांबडा भोपळा १००-१२०, चिंच अखंड ३००-३५०, सुरण : ३००-३५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती. 

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००० -१८००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-१०००, कांदापात : १२०० -१५००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ५०० -६००, पुदिना : ३०० -५००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५०० -६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४०० -६००, पालक : ५०० -७००. 

रविवारी (ता. २३) मोसंबी सुमारे ४० टन, संत्री ३ टन, डाळिंब २०० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे अडीच हजार गोणी, चिक्कू १ हजार डाग, कलिंगड १५ टेम्पो, खरबुजाची १० टेम्पो आवक झाली. सध्या पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खडकवासला परिसरातून आंब्याची सुमारे २०० हारे (मोठ्या पाट्या) आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-७००, मोसंबी : ( ३ डझन) : १८०-३०८, (४ डझन ) : ८०-१८०, संत्रा : (३ डझन) : १८०-३८०, (डझन ४) : ८०-१८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-१०० गणेश १०-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-३०, पपई : ५-१५, चिक्कू : २००-७००, गावरान आंबा - हापूस - १५०-३५०, पायरी ८०-१६०, रायवळ -२०-१००, केशऱ १००-१२० (किलो) 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५०-८०, गुलछडी : ४०-६०, बिजली - १००-१५०, कापरी : ४०-८०, मोगरा : १००-२००, शेवंती - १००-२००, ऑस्टर : २०-४०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिली बंडल : ३-५, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ६०-१२०.

मटण मासळी गणेश पेठतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २३) खोलसमुद्रातील मासळी सुमारे ५ टन, खाडीची अवघी ५० किलो, तर नदीची मासळी सुमारे ५०० किलो आवक झाली होती. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती. दरम्यान, पश्चिम किनारपट्टीवरून पावसामुळे मासळीची आवक बंद असल्याने दर स्थिर होते, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी  (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-,१५००, मोठे १६००, मध्यम: १०००-१२००, लहान ८००-९००, भिला : ७००, हलवा : ८००, सुरमई : ८००, रावस : लहान ७५०-८००, मोठा : १०००, घोळ : ७५०, करली - ३६०-४०० पाला : लहान १४००-१५०० वाम : पिवळी ८०० काळी : ४८०, ओले बोंबील : २८०-३२०, कोळंबी ः लहान ३२०, मोठी : ५५० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : १०००, लॉबस्टर : १४००, मांदेली : १६०, खेकडे : ३२०, चिंबोऱ्या : ५५० 

खाडीची मासळी  सौंदाळे - २८०, नगली - ५५०-६५०, तांबोशी : ५५०, लेपा : लहान ३०० -४००, बांगडा लहान १६०  मोठा -२००-२८०, तिसऱ्या : २४०, खुबे १४० 

नदीची मासळी   रहू : -१६०, कतला : १६०, मरळ : लहान ३६० शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०, खवली : २८०, आम्ळी: १४० खेकडे : २४०, वाम : ५५० 

मटण  बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा: ५००, कलेजी : ५६० 

चिकन  चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०. 

अंडी  गावरान : शेकडा : ७००, डझन : ९६ प्रतिनग : ८ इंग्लिश : शेकडा : ४६३ डझन: ६६ प्रतिनग : ५.५०   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com