agriculture news in marathi, 10% increase in the rate of flower, papdi and coconut | Agrowon

फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १० टक्के वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली. फ्लॉवर, पापडी, घेवडा, शेवगा यांची आवक मंदावल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.  

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली. फ्लॉवर, पापडी, घेवडा, शेवगा यांची आवक मंदावल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.  

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, हिमाचलप्रदेशातून सुमारे ५ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमीळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी, तर इंदौर येथून गाजराची सुमारे ५ टेम्पो आवक झाली. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटो सुमारे ४ हजार क्रेट, फ्लॉवर, कोबी, काकडी, ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, गावरान कैरी सुमारे ८ टेम्पो, तसेच कांदा सुमारे १०० ट्रक, तर स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा - १२०-१५०, बटाटा- ९०-१५०, लसूण - ४००-८००, आले : सातारी ७००-८००, भेंडी : ३००-३५०, गवार : २५०-४००, टोमॅटो - १८०-२००, दोडका : ३५०-३००, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : १५०-१८०, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी २५०-३००, पापडी : ५०० -६००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : १८०-२००, कोबी : १२०-१५०, वांगी : २०० -३००, डिंगरी : १६० -१८०, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३५०, जाड : १५०, शेवगा : ५००, गाजर : १६०-१८० वालवर : ३००-३५०, बीट : १४०-१६०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १८० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ३०० -३५०, पावटा : ७०० -८००, मटार : ७००-८००, तांबडा भोपळा १००-१२०, चिंच अखंड ३००-३५०, सुरण : ३००-३५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती. 

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००० -१८००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-१०००, कांदापात : १२०० -१५००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ५०० -६००, पुदिना : ३०० -५००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५०० -६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४०० -६००, पालक : ५०० -७००. 

रविवारी (ता. २३) मोसंबी सुमारे ४० टन, संत्री ३ टन, डाळिंब २०० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे अडीच हजार गोणी, चिक्कू १ हजार डाग, कलिंगड १५ टेम्पो, खरबुजाची १० टेम्पो आवक झाली. सध्या पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खडकवासला परिसरातून आंब्याची सुमारे २०० हारे (मोठ्या पाट्या) आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-७००, मोसंबी : ( ३ डझन) : १८०-३०८, (४ डझन ) : ८०-१८०, संत्रा : (३ डझन) : १८०-३८०, (डझन ४) : ८०-१८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-१०० गणेश १०-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-३०, पपई : ५-१५, चिक्कू : २००-७००, गावरान आंबा - हापूस - १५०-३५०, पायरी ८०-१६०, रायवळ -२०-१००, केशऱ १००-१२० (किलो) 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५०-८०, गुलछडी : ४०-६०, बिजली - १००-१५०, कापरी : ४०-८०, मोगरा : १००-२००, शेवंती - १००-२००, ऑस्टर : २०-४०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिली बंडल : ३-५, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ६०-१२०.

मटण मासळी
गणेश पेठतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २३) खोलसमुद्रातील मासळी सुमारे ५ टन, खाडीची अवघी ५० किलो, तर नदीची मासळी सुमारे ५०० किलो आवक झाली होती. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती. दरम्यान, पश्चिम किनारपट्टीवरून पावसामुळे मासळीची आवक बंद असल्याने दर स्थिर होते, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-,१५००, मोठे १६००, मध्यम: १०००-१२००, लहान ८००-९००, भिला : ७००, हलवा : ८००, सुरमई : ८००, रावस : लहान ७५०-८००, मोठा : १०००, घोळ : ७५०, करली - ३६०-४०० पाला : लहान १४००-१५०० वाम : पिवळी ८०० काळी : ४८०, ओले बोंबील : २८०-३२०, कोळंबी ः लहान ३२०, मोठी : ५५० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : १०००, लॉबस्टर : १४००, मांदेली : १६०, खेकडे : ३२०, चिंबोऱ्या : ५५० 

खाडीची मासळी 
सौंदाळे - २८०, नगली - ५५०-६५०, तांबोशी : ५५०, लेपा : लहान ३०० -४००, बांगडा लहान १६०  मोठा -२००-२८०, तिसऱ्या : २४०, खुबे १४० 

नदीची मासळी 
 रहू : -१६०, कतला : १६०, मरळ : लहान ३६० शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०, खवली : २८०, आम्ळी: १४० खेकडे : २४०, वाम : ५५० 

मटण 
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा: ५००, कलेजी : ५६० 

चिकन 
चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ७००, डझन : ९६ प्रतिनग : ८ इंग्लिश : शेकडा : ४६३ डझन: ६६ प्रतिनग : ५.५० 
 

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोयाबीनच्या दरात अल्पशी तेजीनागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा...
सोलापुरात हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गुलटेकडीत कोबी, शेवगा, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...