सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...

सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...

कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले.

पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले. शेतकऱ्यांसाठी आम्ही नुकसान सहन करून प्रकल्प चालवित आहोत, अशी व्यथा सोनाई डेअरी उद्योग समुहाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी मांडली. 

राज्यात रोज एक ते सव्वा कोटी लिटर्स दुधाची विक्री पाऊचमधून केली जाते. त्यापैकी ५० ते ६० लाख लिटर दुधाचा वापर ठेलेवाले, हॉटेल्स्, दही-दूध व्यापारी, कार्यालये, चहा विक्रेते, ढाबेवाले करतात. मात्र, संचारबंदीमुळे ग्राहक घराबाहेर नसल्याने ही ५० लाख लिटर दुधाची मागणी घटली आहे. त्यामुळे डेअरी प्रकल्पांमध्ये येणाऱ्या जादा दुधाला पावडरकडे वळवावे लागत आहे, असे श्री. माने यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सध्या सोनाई प्रकल्पाकडून २५ लाख लिटर दुधाची स्विकारणी सुरू आहे. तथापि, तीन दिवसांपूर्वी दहा लाख लिटर दुध जादा आले. या नासलेल्या दुधाचा काहीही उपयोग न झाल्यामुळे तीन कोटी रुपयांचे नुकसान या प्रकल्पाला सहन करावे लागले. 

‘‘जादा दुधाची पावडर करण्याचा पर्याय असला तरी शेतकऱ्यांना सध्या २५ रुपये प्रतिलिटर दूध दर दिल्यानंतर त्यापासून पावडराचा उत्पादन खर्च २५० रुपये प्रतिकिलो येतो. सध्या पावडरचे दर कोसळले आहेत. जादा दुधाची पावडर २०० रुपये दराने विकली गेली तरी आमच्या प्रकल्पाला रोज किमान दहा कोटीचा फटका बसू शकतो. त्यामुळे पावडर निर्मितीला मर्यादा आहेत,’’ असे श्री. माने यांनी स्पष्ट केले.  दूध उत्पादकांना वेळीच सावरावे  भविष्यातील डेअरी उद्योगाचे चित्र चिंताजनक राहील, असे सांगून दशरथ माने म्हणाले की, ‘‘जादा दुधाची समस्या वाढत जाईल. त्यातून राज्याच्या ओढया-नाल्यांमध्ये दूध वाहू शकते. जादा दुधाची स्विकारणी किती दिवस परवडेल याविषयी शंका आहे. यामुळे डेअरी उद्योग मोठ्या आर्थिक संकटाकडे ओढला जाईल. कोरोनामुळे डेअरी संबंधित कामांना मजूर मिळत नाहीत. त्यांचे कुटुंबिय या मजुरांना बाहेर पाठविण्यास तयार नाहीत. डेअरी प्रकल्प चालविण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळणे बंद झाले आहे. प्रोसेसिंग, लोडिंगसाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही. या सर्व घडामोडींचा परिणाम राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यांना वेळीच सावरण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com