agriculture news in Marathi 10 th geography paper postpone Maharashtra | Agrowon

दहावीचा भूगोलचा पेपर पुढे ढकलला

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 मार्च 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. २३ मार्चला होणारा भूगोल विषयाचा पेपर आता ३१ मार्चनंतर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. 

दहावी बोर्डाचा शेवटचा पेपर राहिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधीत ही परीक्षा नियोजित होती. मात्र राज्यात कोरोनाचे थैमान पाहता, शेवटचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे.

इयत्ता १० वी परीक्षेचा सोमवारी (ता. २३) होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. या पेपरची पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल, असे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, दहावी बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर २३ मार्चला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, हा पेपर ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यात ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६५ हजार परीक्षार्थी वाढले आहेत. 

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार आहेत. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला होता.

कोणकोणत्या परीक्षा रद्द अथवा पुढे ढकलल्या?

  • पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द
  • नववी ते अकरावी परीक्षा१५ एप्रिलनंतर 
  • दहावीचा शेवटचा पेपर ३१ मार्चनंतर
  • पेपर तपासणी ३१ मार्चपर्यंत सध्या तरी थांबवण्यात येईल
  • पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गुण संकलन करून निकाल दिला जाईल
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम (दहावी वगळून)

इतर ताज्या घडामोडी
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...