agriculture news in marathi, 10 thousand 521 villages in Maharashtra faces low ground water level | Agrowon

राज्यातील १०,५२१ गावांत पाणीपातळी खालावली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाचा चांगलाच चटका वाढला आहे. परिणामी, भूगर्भातील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जाऊ लागली आहे. राज्यातील ३५३ तालुक्यांंपैकी २५२ तालुक्यांतील सुमारे दहा हजार ५२१ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली आहे. त्यापैकी १३० तालुक्यांतील सात हजार ३२२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यावाचून भूगर्भ चांगलाच तहानलेला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाचा चांगलाच चटका वाढला आहे. परिणामी, भूगर्भातील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जाऊ लागली आहे. राज्यातील ३५३ तालुक्यांंपैकी २५२ तालुक्यांतील सुमारे दहा हजार ५२१ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली आहे. त्यापैकी १३० तालुक्यांतील सात हजार ३२२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यावाचून भूगर्भ चांगलाच तहानलेला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  

गेल्या वर्षी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे या भागातील धरणे तुडुंब भरली होती. मात्र, विदर्भातील पश्चिम भागात अत्यंत कमी, पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणेही कमीअधिक स्वरूपात भरली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचा परिणाम भूजल पातळीच्या स्थितीवर झाला आहे. 

विभागिहाय भूजलपातळी खालावलेल्या गावांची संख्या

विभाग
 
तीन मीटरहून अधिक
 
दोन ते तीन मीटर
 
एक ते दोन मीटर
 
एक मीटरपेक्षा जास्त
 
ठाणे १४ ११३ १२७
नाशिक ३२ १७८ ६८४ ८९४
पुणे ३० ३२ २३८ ३००
औरंगाबाद ३५७ ७०७ १८०१ २८६५
अमरावती ४७८ १३७७ २३९१ ४२४६
नागपूर ७९ ३४१ १६६९ २०८९
एकूण ९७६ २६४९ ६८९६ १०,५२१ 

विहिरीच्या पाणीपातळीचा अभ्यास  
भूगर्भातील पाणीपातळीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय तीन हजार ९२० निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. गेल्या मार्च महिना अखेरमधील निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीचा मागील पाच वर्षांतील मार्च महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक करण्यात आला. त्यामध्ये राज्यातील एकूण दहा हजार ५२१ गावात भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आहे. त्यापैकी ९७६ गावांत तीन मीटरपेक्षा घट आढळून आली आहे. दोन हजार ६४९ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, तर सहा हजार ८९६ गावांत एक ते दोन मीटरने घट आढळून आली आहे. 

विदर्भात सर्वाधिक खोल पाणीपातळी
विदर्भात कमी झालेल्या पावसाचा परिणाम १११ तालुक्यांत मार्च महिन्यापासून दिसून आले. सध्या विदर्भातील सुमारे सहा हजार ३३५ गावांत एक मीटरहून अधिक खोल पाणीपातळी गेली आहे. यामध्ये नागपूर विभागातील दोन हजार ८९ तर अमरावती विभागातील चार हजार २४६ गावांचा समावेश आहे. त्यापैकी चार हजार ६० गावात एक ते दोन मीटर, तर एक हजार ७१८ गावात दोन ते तीन मीटर, तर ५५७ गावात तीन मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेली आहे. राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे.      

मराठवाड्यात ५५ तालुक्यांचा समावेश
विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही भूजलपातळीचा अधिक झालेल्या पाण्याच्या उपशामुळे मराठवाड्यातील ५५ तालुक्यांतील दोन हजार ८६५ गावांत एक मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेली आहे. यात औंरगाबाद व नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. त्यापैकी एक हजार ८०१ गावांत एक ते दोन मीटर, तर ७०७ गावांत दोन ते तीन मीटर, तर ३५७ गावांत तीन मीटरहून अधिक खोल पाणी पातळी गेली आहे.    

कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी गावे 
चांगल्या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील पाणीपातळी चांगलीच वाढ झाली होती. त्यातच कमी झालेला उपशामुळे या भागातील पाणी पातळी कमी झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील एकूण १३२१ गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी एक हजार ३५ गावांत एक ते दोन मीटर, तर २२४ गावांत दोन ते तीन मीटर, तर ६२ गावात तीन मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेल्याचे स्पष्ट झाले आहे.  

भूजल पातळी खोल जाण्याची कारणे 

  • पिकांसाठी पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती  
  • बारामही ऊस, केळी, संत्री, द्राक्षे अशा पिकांसाठी भूजलाचा अतिवापर 
  • भूजल व्यवस्थापनाचा अभाव 
  • कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण 
  • पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी 

गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या वाढलेल्या उपशामुळे पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे. त्यामुळे सात हजार ३२२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे.  
- शेखर गायकवाड, संचालक, 
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...