agriculture news in Marathi 10 thousand per hector help announced to farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार मदत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.२३) १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेे.

मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.२३) १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेे. यातून दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टरी १० हजार तर फळबागांसाठी २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. 

पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब सहभागी झाले होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. केंद्र सरकारकडे राज्याचे एकूण ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळाचे १ हजार ६५ कोटी, पूर्व विदर्भात आलेल्या पुरासंदर्भात ८०० कोटी आणि जीएसटी परताव्याचा समावेश आहे.  

याबाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करुनही ही रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही. त्याचबरोबर राज्यात ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरु आहे, पण अजूनही पाहणीसाठी केंद्राचे पथक राज्यात आले नाही. राज्य सरकारने दोन तीनदा केंद्र सरकारला विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की जिरायत, बागायत जमिनीसाठी ६८०० प्रति हेक्टर आणि फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे, त्यामुळे कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे. म्हणजे ५ एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत मिळेल. 

अतिवृष्टीमुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही भरीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

दिवाळीपर्यंत मदत देणार
शेतपिकांचे झालेले नुकसान, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरे, रस्ते, वीजेचे पडलेले खांब या सर्व बाबींसाठी ही मदत असेल. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

असे आहे पॅकेज (कोटींत) 
५५०० 

शेती, घरांसाठी
२६३५ 
रस्ते आणि पूल 
३००
नगरविकास
२३९
महावितरण ऊर्जा
१०२
जलसंपदा
१ हजार 
ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा


इतर अॅग्रो विशेष
शासकीय खरेदीला प्रारंभ; कापूस दरात...जळगाव ः खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच...
सहकारी संघाकडूनही गाईच्या दूधदरात कपात नगर ः लॉकडाउन झाल्यानंतर दुधाची मागणी कमी झाली...
पशुखाद्य दरात वाढसांगली ः अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची...नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची...
गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणीसासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित...
ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन...मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच...
विदर्भाच्या काही भागांत थंडीपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले...
कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत...पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी...
पानांचे दर दबावात; उत्पादकांना फटकासांगली : गेल्या आठ महिन्यांपासून बाजारपेठेत...
खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल...जळगाव ः खानदेशात कापूस महामंडळाकडून (सीसीआय)...
‘कार्तिकी’च्या काळात पंढरपूरसह ...सोलापूर : यंदा कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर...
‘महाबीज’चे कर्मचारी जाणार सात...अकोला ः सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा यांसह...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
कृषी सचिवांच्या गावातील शेतकऱ्यांचा कल...अकोला ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पूर्वहंगामी द्राक्षाला २०० कोटींचा फटकानाशिक : यंदा पूर्वहंगामी द्राक्ष हंगामाच्या...
शासकीय योजनांच्या विहिरींमुळे वाढतोय...मालेगाव, जि. वाशीम ः  जिल्हा परिषद, कृषी...
दहिगावात दोन एकरांतील कापूस नेला चोरूनअकोला ः यंदा शेतशिवारात सर्वच पिकांची उत्पादकता...