सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, महापूरग्रस्तांना १०० कोटी वितरित
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, महापूरग्रस्तांना १०० कोटी वितरित

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, महापूरग्रस्तांना १०० कोटी वितरित

सांगली : जिल्ह्यात जुलै ते ऑक्‍टोबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, महापुरामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आपदग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अतिवृष्टी व पुरामुळे जिरायत, बागायत व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांसाठी १०० कोटी ६६ लाख ३७ हजार ५३७ रुपये अनुदान मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव व कडेगाव तालुक्‍यासाठी वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, एनडीआरएफ निकषानुसार ३३ कोटी ३८ लाख ७ हजार २९६ व एसडीआरएफच्या निकषानुसार ६७ कोटी २८ लाख ३० हजार २४१ रुपये असे एकूण १०० कोटी ६६ लाख ३७ हजार ५३७ रुपये अनुदान मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव व कडेगाव तालुक्‍यांसाठी वितरित करण्यात आले आहे. 

तालुकानिहाय एनडीआरएफच्या निकषानुसार, एसडीआरएफच्या निकषानुसार व एकूण अनुदान वितरण असे- मिरज - १०.४९ कोटी, २१.१४ कोटी, एकूण ३१.६३ कोटी. वाळवा- ९.२७ कोटी, १८.७० कोटी, एकूण २७.९८ कोटी, शिराळा- ४.४९ कोटी, ९.०५ कोटी, एकूण १३.५४ कोटी. पलूस-७.८१ कोटी, १५.७४ कोटी, एकूण २३.५५ कोटी. तासगाव- ३०.५१ लाख, ६१.३० लाख, एकूण ९२.६१ लाख. कडेगाव- ९९.८० लाख, २.०१ कोटी, एकूण ३.१८ कोटी रुपये. 

लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करा

बॅंकांकडे तपशीलवार यादीसह पाठवलेली रक्कम सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केल्याबाबतचे व कोणतीही रक्कम वाटपाविना शिल्लक नाही असे प्रमाणपत्र बॅंकांकडून घ्यावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रकमेच्या माहितीसह तहसील कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com