Agriculture news in Marathi 100 crore farmers in Gondia district are tired | Agrowon

गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०० कोटी थकले 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

गोंदिया ः मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धान विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १५ हजारावर शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. ऐन खरिपाच्या तोंडावर ही आर्थिक कोंडी झाल्याने ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. 

गोंदिया ः मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धान विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १५ हजारावर शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. ऐन खरिपाच्या तोंडावर ही आर्थिक कोंडी झाल्याने ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. 

धानाकरिता केंद्र सरकारने १८३५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने ५०० रुपये बोनस व त्यानंतर २०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले. याप्रमाणे धानाचे दर २५०० रुपये क्‍विंटलवर पोचले. परिणामी शेतकऱ्यांनी आपल्याकडील बहुतांशी धान शासकीय केंद्राला विकले. जिल्ह्यात खरीप हंगामात ७० शासकीय धान केंद्र होते. त्यांच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ३५ लाख क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली. 

या धानाची किंमत ६०० कोटी इतकी होती. यापैकी ५०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. शासनाकडून निधी मिळण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी १५ हजार शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपयांचे चुकार थकले आहेत. चुकाऱ्याची रक्‍कम थेट खात्यात जमा होत असल्याने शेतकरी हे पाहण्यासाठी बॅंकेच्या पायऱ्या झिजवीत आहेत. मात्र प्रत्येकवेळी त्यांना निराश होऊनच परतावे लागते. खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे हे चुकारे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

रब्बीचे १५ लाख क्‍विंटल धान खरेदीचा अंदाज 
जिल्ह्यात रब्बी हंगामात ३५ हजार हेक्‍टरवर धानाची लागवड करण्यात आली. सध्या त्याची कापणी, मळणी सुरू आहे. या धानाच्या खरेदीकरिता ७० केंद्र प्रस्तावित आहेत. त्या माध्यमातून १५ लाख क्‍विंटल धान खरेदीचा अंदाज आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...