वर्धा जिल्ह्यात सावकारांचे शेतकऱ्यांवर १०० कोटी कर्ज

वर्धा : जिल्हयात १३९ परवानाधारक सावकार आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कर्जाची उचल केल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.
 100 crore loan to farmers in Wardha district
100 crore loan to farmers in Wardha district

वर्धा ः हंगामात बॅंकाकडून पीककर्जाच्या बाबतीत नियमांवर बोट ठेवत आखडता हात घेतला जातो. त्यामुळेच शेतकऱ्यांना शेतीसाठी पैशाची सोय करण्यासाठी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात. वर्धा जिल्हयात १३९ परवानाधारक सावकार आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कर्जाची उचल केल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 

निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवठा, नैसर्गिक संकट यामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीमधून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शेतकऱ्यांना शक्‍य होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना निविष्ठांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या पैशासाठी पीककर्ज आधार ठरतो. मात्र राष्ट्रीयकृत बॅंकांकडून नियमांवर बोट ठेवत पीककर्ज नाकारले जाते. परिणामी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर खासगी व्यक्‍ती किंवा परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यामुळे त्यांच्याभोवती सावकारी पास आवळला जातो. 

जिल्हयात सावकारांकडून सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्जवाटप झाले आहे. त्यातील सर्वाधिक २० कोटी ८५ लाख ५७ हजार रुपयांच्या कर्जाची उचल एकट्या समुद्रपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यावरूनच शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.

परवानाधारक सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास ९ टक्‍के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ तसेच बिगर कृषी विनातारण कर्जासाठी १८ टक्‍के व्याजाची आकारणी केली जाते. परिणामी शेतकऱ्यांना व्याजापोटी मोठी रक्‍कम अदा करावी लागते. अनेक कर्जदार शेतकऱ्यांना त्यामुळेच या कर्जाची परतफेड असह्य होते. 

तालुकानिहाय कर्ज (कोटी रुपये) 

वर्धा ६,८७,०१ 
आर्वी ४१.३३
कारंजा घाडगे ५८९.६४ 
आष्टी १२६.४०
सेलू  ५२०.४४
समुद्रपूर २०८५.५७
हिंगणघाट २.०१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com