पुणे झेडपी : भाकड कालावधीत पशुखाद्यासाठी १०० टक्के अनुदान

पुणे झेडपी : भाकड कालावधीत पशुखाद्यासाठी १०० टक्के अनुदान
पुणे झेडपी : भाकड कालावधीत पशुखाद्यासाठी १०० टक्के अनुदान

पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ गायी आणि म्हशींना भाकड कालावधीत १०० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करण्यात येतो. लाभार्थ्यांनी हे खाद्य स्वत: खरेदी करून, पावत्या सादर केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये अनुदान थेट जमा करण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी केल आहे. 

अनुदानावर पशुखाद्य पुरवठा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या लाभधारकांना १०० टक्के अनुदानावर अनुक्रमे दुधाळ गायींच्या भाकड कालावधीत १५० किलो, तर म्हशीसाठी २२५ किलो पुशखाद्य पुरवठा केला जातो. पुणे जिल्हा परिषद खरेदी समितीद्वारा या पशुखाद्य खरेदीसाठी प्रतिकिलो २३ रुपयांचा दर निश्चित केला आहे. खरेदी समितीने निश्चित केलेल्या मापदंडानुसार लाभार्थीने स्वतः खरेदी करून त्याचे पुराव्यादाखल पुरवठादाराकडील विक्री पावत्या सादर करणे बंधनकारक राहील. खरेदी केलेल्या साहित्याची गुणवत्ता जिल्हा परिषदेकडून निश्चित केलेल्या कार्यपद्धतीने तपासली जाईल व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पात्र अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय योजनेतून प्राप्त झालेली अथवा स्वतःची दुधाळ जनावरे असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज १५ जुलैपासून पंचायत समिती कार्यालयात व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध होणार आहेत, असे सभापती पवार यांनी कळविले आहे.

सन २०१९-२० करीता प्राप्त निधीच्या अनुषंगाने अनुसूचित जातीच्या ७४०, अनुसूचित जमातीच्या ३७६ लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, पात्र पशुपालकांनी या योजनेत सहभाग नोंदवावा. तसेच सन २०१८-१९ मधील निवड झालेल्या एकूण ८०० लाभार्थीनीही कागदपत्राची पूर्तता करून अनुदानाचा लाभ घ्यावा.  - सुजाता पवार, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com