Agriculture news in Marathi, 100% feed during bald cows, buffaloes | Agrowon

पुणे झेडपी : भाकड कालावधीत पशुखाद्यासाठी १०० टक्के अनुदान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ गायी आणि म्हशींना भाकड कालावधीत १०० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करण्यात येतो. लाभार्थ्यांनी हे खाद्य स्वत: खरेदी करून, पावत्या सादर केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये अनुदान थेट जमा करण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी केल आहे. 

पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ गायी आणि म्हशींना भाकड कालावधीत १०० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करण्यात येतो. लाभार्थ्यांनी हे खाद्य स्वत: खरेदी करून, पावत्या सादर केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये अनुदान थेट जमा करण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी केल आहे. 

अनुदानावर पशुखाद्य पुरवठा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या लाभधारकांना १०० टक्के अनुदानावर अनुक्रमे दुधाळ गायींच्या भाकड कालावधीत १५० किलो, तर म्हशीसाठी २२५ किलो पुशखाद्य पुरवठा केला जातो. पुणे जिल्हा परिषद खरेदी समितीद्वारा या पशुखाद्य खरेदीसाठी प्रतिकिलो २३ रुपयांचा दर निश्चित केला आहे. खरेदी समितीने निश्चित केलेल्या मापदंडानुसार लाभार्थीने स्वतः खरेदी करून त्याचे पुराव्यादाखल पुरवठादाराकडील विक्री पावत्या सादर करणे बंधनकारक राहील. खरेदी केलेल्या साहित्याची गुणवत्ता जिल्हा परिषदेकडून निश्चित केलेल्या कार्यपद्धतीने तपासली जाईल व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पात्र अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय योजनेतून प्राप्त झालेली अथवा स्वतःची दुधाळ जनावरे असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज १५ जुलैपासून पंचायत समिती कार्यालयात व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध होणार आहेत, असे सभापती पवार यांनी कळविले आहे.

सन २०१९-२० करीता प्राप्त निधीच्या अनुषंगाने अनुसूचित जातीच्या ७४०, अनुसूचित जमातीच्या ३७६ लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, पात्र पशुपालकांनी या योजनेत सहभाग नोंदवावा. तसेच सन २०१८-१९ मधील निवड झालेल्या एकूण ८०० लाभार्थीनीही कागदपत्राची पूर्तता करून अनुदानाचा लाभ घ्यावा. 
- सुजाता पवार, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती
 

इतर बातम्या
बुलडाणा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पीक...बुलडाणा ः वऱ्हाडात आजवरची स्थिती पाहली तर...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
नांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ....नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...
रस्त्यालगत हरितपट्ट्यांमध्ये मानवी...इंग्लंड आणि वेल्समध्ये दरवर्षी सुमारे ५ लाख...
वादळी वाऱ्याने भोपळा, कारल्याचे मांडव...नाशिक : जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेबाबत...नाशिक : जागतिक द्राक्ष उत्पादनात नाशिकचा मोठा...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सांगली जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू...सांगली ः शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपासून चारा...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...