राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादन

राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादन
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादन

भवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त ऊस असूनही मार्च महिन्यातच साखरेचा उत्पादनाचा आकडा १०० लाख टनांवर पोचला आहे. आतापर्यंत राज्यात ८९३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ९९.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.  ही उच्चांकी कामगिरी राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी साधली असून, आतापर्यंत यापैकी ७८ साखर कारखाने बंद झाले आहेत. येत्या मार्चअखेर बहुतांश कारखान्यांचा हंगाम संपेल. मात्र, तोपर्यंत साखरेचे उत्पादन आतापर्यंत झालेल्या १ कोटी ७ लाख टनाला ओलांडून पुढे जाईल. मागील वर्षी १४ मार्चपर्यंत राज्यातील १८६ साखर कारखान्यांनी ८४० लाख टन उसाचे गाळप करून ९३.२० लाख टनापर्यंत साखर उत्पादनाची मजल मारली होती. या वर्षी हुमणीने छळूनही व पाणीटंचाईने मारूनही उसाच्या उत्पादनाचा विक्रमी आकडा राज्याने गाठला आहे. या विक्रमी साखर उत्पादनाने बहुतांश कारखान्यांकडील स्वतःची गोदामे अपुरी पडली. त्यातही साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांना तात्पुरती भाडोत्री गोदामे उभारावी लागली आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा साखर उतारा फक्त ०.०९ टक्‍क्‍यांनी अधिक असूनही कारखान्यांची वाढलेली दैनंदिन गाळपक्षमता, पाऊस कमी असतानाही उसाच्या पिकावर शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत, यामुळे उत्पादन वाढले. राज्यात या हंगामात पुणे व सोलापूर दोन विभाग केल्याने आजअखेर गाळपात कोल्हापूर विभाग ऊसगाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात राज्यात आघाडीवर राहिला. या विभागातील ३८ साखर कारखान्यांनी २०६ लाख टन उसाचे गाळप करून १२.२८ टक्के साखर उताऱ्याने २५.३२ लाख टन साखर उत्पादित केली. त्या खालोखाल सोलापूर विभागातील ४४ साखर कारखान्यांनी १९९ लाख टन उसाचे गाळप करीत दुसरा क्रमांक मिळविला. मात्र, साखरेच्या उत्पादनात पुणे विभागाने २१.६३ लाख टनाचा आकडा गाठून साखरेचे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन घेतले.

गळीत हंगामाची आकडेवारी (ऊसगाळप व साखर उत्पादन लाख टनांत)

विभाग कारखाने गाळप साखर उत्पादन साखर उतारा
कोल्हापूर ३८ २०६.१५ २५.३२ १२.२८
पुणे ३२ १८८.६६ २१.६३ ११.४७
सोलापूर ४४ १९९.९२ २०.४३ १०.२२  
नगर २८ १३४.७१ १४.७७ १०.९७
औरंगाबाद २४ ८२.१८ ८.५३  १०.३९
नांदेड २३ ७३.०५ ८.१० ११.०९
अमरावती ३.२६ ०.३३ १०.३०
नागपूर ५.५५ ०.५५ ९.९७
एकूण १९५ ८९३.४७ ९९.६८ ११.१५

राज्यातील साखर उत्पादन  (लाख टनांत)

  • २००८-०९ ......४६.१४
  • २००९-१० ...... ७१.०६
  • २०१०-११. .....९०.७२
  • २०११-१२ ......८९.९६
  • २०१२-१३ ......७९.८७
  • २०१३-१४. ..... ७७.१२
  • २०१४-१५ .....१०५.१४
  • २०१५-१६ .......८४.१५
  • २०१६-१७ .......४२ 
  • २०१७-१८ ......१०७.२१
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com