परभणी जिल्ह्यात पाच लघु तलावांत १०० टक्के पाणी

परभणी : पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २२ पैकी ५ लघु तलावांत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
 100 percent water in five small lakes in Parbhani district
100 percent water in five small lakes in Parbhani district

परभणी : पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २२ पैकी ५ लघु तलावांत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. परंतु, पेडगाव (ता.परभणी) येथील लघु तलाव अद्याप कोरडाच आहे. जिल्ह्यातील २२ लघु तलांवामध्ये सरासरी ४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

निवळी (ता.जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पामध्ये १०० टक्के, तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. २२ पैकी ८ लघु तलावांमध्ये २५ टक्केपर्यंत, ५ लघु तलावांमध्ये ५१ ते ७५ टक्के, ८ लघु तलावांमध्ये ७६ ते १०० टक्के उपयुक्त पाणी आहे.

शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेल्या लघु तलवांमध्ये राणी सावरगाव, टाकळवाडी, कोद्री (सर्व ता. गंगाखेड), तांदुळवाडी (ता. पालम)  चिंचोली (ता.जिंतूर) या पाच तलावांचा समावेश आहे. पेडगाव तलाव अद्याप कोरडा आहे.

झरी (ता.पाथरी ) ९२ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) २ टक्के, पिंपळदरी ५४ टक्के, देवगाव (ता.जिंतूर) ७ टक्के, जोगवाडा (ता.जिंतूर) ६ टक्के, बेलखेडा (ता.जिंतूर) ४२ टक्के, वडाळी (ता.जिंतूर) ६ टक्के, चारठाणा (ता.जिंतूर) ७ टक्के, आडगाव (ता.जिंतूर) ६७ टक्के, केहाळ (ता.जिंतूर) ३ टक्के, भोसी (ता.जिंतूर) १ टक्का, कवडा (ता.जिंतूर) ५ टक्के, मांडवी (ता. जिंतूर) ६० टक्के, दहेगाव (ता.जिंतूर) ८ टक्के, पाडळीत ५३ टक्के उपयुक्त पाणी जमा झाले आहे. 

जिंतूर तालुक्यातील ८ लघु तलावांमध्ये १० टक्के पेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. हे तलाव भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची गरज आहे. तरच या तलावांवर अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. अन्यथा, लवकरच तीव्र पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com