agriculture news in marathi 1000 to 3500 per quintal of chilli in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात मिरची १००० ते ३५०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021

नांदेड : नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडा नाका येथील ठोक भाजीपाला बाजारात सध्या हिरव्या मिरचीला २ हजार ते अडीच हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. सध्या दररोज चार ते पाच टन हिरवी मिरची बाजारात येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

नांदेडमध्ये क्विंटलला २००० ते २५०० रुपये 

नांदेड : नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडा नाका येथील ठोक भाजीपाला बाजारात सध्या हिरव्या मिरचीला २ हजार ते अडीच हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. सध्या दररोज चार ते पाच टन हिरवी मिरची बाजारात येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसह बाहेर तेलंगणा, कर्नाटक राज्यातून मिरचीची आवक होत आहे. शहरातील इतवारा व तरोडा नाका परिसरात ठोक बाजारात सध्या चार ते पाच टन आवक होत आहे. या मिरचीला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळत आहे. तर आठवडे व किरकोळ विक्री बाजारात हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री होत आहे, अशी माहिती व्यापारी महंमद जावेद यांनी दिली.

पुण्यात प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) हिरव्या मिरचीची सुमारे १० टेम्पो आवक झाली. या वेळी दहा किलोला २५० ते ३५० रुपये दर होता. आवक ही प्रामुख्याने आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यातून होत आहे. पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून देखील अल्पप्रमाणात आवक होत असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. 

नगरमध्ये क्विंटलला २००० ते २५०० रुपये

नगर ः येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या मिरचीची ५५ क्विंटलची आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २ हजार ते २ हजार ५०० व सरासरी २ हजार २५० रुपये दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे. 

नगर बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून दर दिवसाला हिरव्या मिरचीची आवक आणि दरातही सतत चढउतार होत आहे. १ ऑगस्ट रोजी ४५ क्विंटलची आवक झाली. दर ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये व सरासरी ३ हजार २५० रुपये मिळाला. ३० जुलै रोजी हिरव्या मिरचीची १०० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार ५०० व सरासरी २ हजार रुपये दर मिळाला.  

२५ जुलै रोजी ५२ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार व सरासरी २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. २३ जुलै रोजी ८५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार रुपये व सरासरी २ हजार ७५० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

अकोल्यात क्विंटलला २००० ते २५०० रुपये

अकोला ः येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. ४) हिरवी मिरची २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली गेली. या हंगामात लागवड केलेल्या पिकातून नवीन मिरचीची आवक सुरु झाली आहे. सध्या आवक २५ ते ३० क्विंटलपर्यंत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

येथील जनता भाजी बाजारातील व्यवहार आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे शेतमालाची आवकही सुधारत आहे. गुरुवारी हिरव्या मिरचीची ३० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. सध्या ही मिरची साधारणतः २००० पासून विक्री होत आहे. चांगल्या दर्जाची मिरची २५०० पेक्षा अधिक दराने विकली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

हिरव्या मिरचीची किरकोळ विक्री ४० ते ६० रुपयांदरम्यान केली जात आहे. येत्या काळात हिरव्या मिरचीची आवक वाढल्यास त्याचे दरावर परिणाम होऊ शकतात, असेही सांगण्यात आले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये दर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) हिरव्या मिरचीची १४२ क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते २००० रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती औरंगाबाद बाजार समितीतर्फे देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २९ जुलैला ५५ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी १७५० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. ३१ जुलैला ५१ क्विंटल आवक झालेल्या मिरचीचे सरासरी दर १३५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. एक ऑगस्टला मिरचीची आवक ६३ क्विंटल, तर सरासरी दर १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

दोन ऑगस्टला ६९ क्विंटल आवक झालेल्या मिरचीला १७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ३ ऑगस्टला मिरचीची आवक ३० क्विंटल, तर सरासरी दर १९०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ४ ऑगस्टला ४६ क्विंटल आवक झालेल्या मिरचीला सरासरी १९०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

परभणीत क्विंटलला २५०० ते ३००० रुपये

परभणी ः येथील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ५) हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीलाला प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ३०००  रुपये, तर सरासरी २७२५  रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, आर्वी आदी गावे, हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार परिसर तसेच नाशिक जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी १५ ते ४० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.५) हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ८० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

जळगावात प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.५) हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० व सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. दर टिकून होते. पण गेल्या पाच ते सहा दिवसांत दरात किंचित घट झाली आहे. आवक जामनेर, औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, यावल, चोपडा आदी भागातून होत आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटलला १००० ते २५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे दर काहीसे टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज १० ते १५ क्विंटलपर्यंत राहिली. सर्व आवक स्थानिक भागातून झाली. नजीकच्या उस्मानाबाद भागातूनही काहीशी आवक राहिली. पण ती तुलनेने कमी होती.  गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. पण मागणी असल्याने दर टिकून आहेत.

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक काहीशी अशीच रोज ८ ते १० क्विंटलपर्यंत होती. तर दर प्रतिक्विंटलला किमान ९०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये होता. त्या आधीच्या सप्ताहामध्येही दरामध्ये किरकोळ चढ-उतार वगळता दर टिकूनच होते.


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...