अण्णासाहेब पाटील महामंडळाने १००० प्रकरणे थांबवली

महामंडळातून मराठा तरुणांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी दहा लाखांपर्यंत व्याज परतावा कर्ज दिले जाते. दोन वर्षांत अनेक तरुण रोजगाराला लागले आहेत. मात्र, काही जिल्ह्यांमधून अनेक लाभार्थ्यांच्या नावासोबत एकच मोबईल नंबर टाकल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे साधारण एक हजार प्रकरणे थांबवली आहेत. त्यावर प्रत्येक ‘केस स्टडी’ करूनच निर्णय होईल. महामंडळाच्या पारदर्शकतेमुळे चुकीचे काम करताच येणार नाही.’ — नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
annasaheb patil mahamadal
annasaheb patil mahamadal

नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याजपरतावा कर्ज योजनेतून ट्रॅक्टरसाठी कर्ज घ्यायला अर्ज दाखल करताना अनेक लाभार्थ्यांच्या नावासोबत एकच मोबईल नंबर असल्याचे तपासणीत समोर आल्याने महामंडळाने पाच जिल्ह्यांमधील सुमारे एक हजार प्रकरणे थांबवली आहेत. महामंडळाच्या योजनाचा लाभ घेण्याबाबत ज्या लाभार्थ्यांना रस नाही त्यांच्या नावे टॅक्ट्रर वितरकच पुढाकार घेत असल्याचा महामंडळाला संशय आहे.  मराठा समाजातील तरुणांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत दहा लाखांपर्यंत व्याजपरतावा कर्ज दिले जाते. महामंडळाच्या आजपर्यंत राज्यभरातून १२ हजार ९०१ लाभार्थींना व्यवसायासाठी कर्जप्रकरणे मंजूर झाली असून, त्यांच्यासाठी ६६३ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. महामंडळामार्फत विविध व्यवसायांसाठी कर्ज घेतलेल्या लाभार्थींचे तब्बल सहा हजार ६७५ लाभार्थींचे २६ कोटी रुपयांचे व्याज भरले आहे.  महामंडळाकडून कर्ज घेताना लाभार्थ्यांने अर्जासह सर्व माहिती आणि मोबाईल नंबर महामंडळाच्या संकेतस्थळावर भरावी लागते. त्याची महामंडळाचे अधिकारी तपासणी करतात. नंतरच पुढील प्रक्रिया होते. महामडंळाकडून शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी ट्रॅक्टरसाठीही कर्ज दिले जाते. नगर, नाशिक, पुणे व अन्य काही जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरच्या मागणीसाठी सुमारे एक हजार लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संकेस्थळावर माहिती अपलोड केली. मात्र त्यात अनेक लाभार्थ्यांच्या अर्जासोबत एकाच क्रमांकाचा मोबाईल नंबर असल्याची बाब महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत उघड झाली.  महामंडळाच्या योजनाचा लाभ घेण्याबाबत ज्या लाभार्थ्यांना रस नाही त्यांच्या नावे ट्रॅक्टर वितरकच पुढाकार घेत असल्याचा महामंडळाला संशय आहे. त्यामुळे ही एक हजार प्रकरणे थांबवली आहेत. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या लाभासाठी लाभासाठी कर्ज मिळावे म्हणून ट्रॅक्टरचे वितरक महामंडळाच्या वरिष्ठांकडे चकरा मारत होते. याबाबत आता महामंडळ अधिक खोलात जाऊन चौकशी करणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com