agriculture news in Marathi 1000 proposal pending in Annasaheb patil mahamandal Maharashtra | Agrowon

अण्णासाहेब पाटील महामंडळाने १००० प्रकरणे थांबवली

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

महामंडळातून मराठा तरुणांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी दहा लाखांपर्यंत व्याज परतावा कर्ज दिले जाते. दोन वर्षांत अनेक तरुण रोजगाराला लागले आहेत. मात्र, काही जिल्ह्यांमधून अनेक लाभार्थ्यांच्या नावासोबत एकच मोबईल नंबर टाकल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे साधारण एक हजार प्रकरणे थांबवली आहेत. त्यावर प्रत्येक ‘केस स्टडी’ करूनच निर्णय होईल. महामंडळाच्या पारदर्शकतेमुळे चुकीचे काम करताच येणार नाही.’
— नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याजपरतावा कर्ज योजनेतून ट्रॅक्टरसाठी कर्ज घ्यायला अर्ज दाखल करताना अनेक लाभार्थ्यांच्या नावासोबत एकच मोबईल नंबर असल्याचे तपासणीत समोर आल्याने महामंडळाने पाच जिल्ह्यांमधील सुमारे एक हजार प्रकरणे थांबवली आहेत. महामंडळाच्या योजनाचा लाभ घेण्याबाबत ज्या लाभार्थ्यांना रस नाही त्यांच्या नावे टॅक्ट्रर वितरकच पुढाकार घेत असल्याचा महामंडळाला संशय आहे. 

मराठा समाजातील तरुणांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत दहा लाखांपर्यंत व्याजपरतावा कर्ज दिले जाते. महामंडळाच्या आजपर्यंत राज्यभरातून १२ हजार ९०१ लाभार्थींना व्यवसायासाठी कर्जप्रकरणे मंजूर झाली असून, त्यांच्यासाठी ६६३ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. महामंडळामार्फत विविध व्यवसायांसाठी कर्ज घेतलेल्या लाभार्थींचे तब्बल सहा हजार ६७५ लाभार्थींचे २६ कोटी रुपयांचे व्याज भरले आहे. 

महामंडळाकडून कर्ज घेताना लाभार्थ्यांने अर्जासह सर्व माहिती आणि मोबाईल नंबर महामंडळाच्या संकेतस्थळावर भरावी लागते. त्याची महामंडळाचे अधिकारी तपासणी करतात. नंतरच पुढील प्रक्रिया होते. महामडंळाकडून शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी ट्रॅक्टरसाठीही कर्ज दिले जाते. नगर, नाशिक, पुणे व अन्य काही जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरच्या मागणीसाठी सुमारे एक हजार लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संकेस्थळावर माहिती अपलोड केली. मात्र त्यात अनेक लाभार्थ्यांच्या अर्जासोबत एकाच क्रमांकाचा मोबाईल नंबर असल्याची बाब महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत उघड झाली. 

महामंडळाच्या योजनाचा लाभ घेण्याबाबत ज्या लाभार्थ्यांना रस नाही त्यांच्या नावे ट्रॅक्टर वितरकच पुढाकार घेत असल्याचा महामंडळाला संशय आहे. त्यामुळे ही एक हजार प्रकरणे थांबवली आहेत. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या लाभासाठी लाभासाठी कर्ज मिळावे म्हणून ट्रॅक्टरचे वितरक महामंडळाच्या वरिष्ठांकडे चकरा मारत होते. याबाबत आता महामंडळ अधिक खोलात जाऊन चौकशी करणार आहे. 
 


इतर बातम्या
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...