सिंधुदुर्गातील १० हजारांवर शेतकरी कर्जमाफीस पात्र

 10,000 farmers are eligible for loan waiver in Sindhudurg
10,000 farmers are eligible for loan waiver in Sindhudurg

सिंधुदुर्ग : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील १० हजार ९२० शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना ५१ कोटी १० लाख रुयांची कर्जमाफी मिळणार आहे.

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांसह विविध कारणांमुळे राज्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला होता. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्जदारांना शासनाने २ लाख मर्यादेत कर्जमाफीची घोषणा केली. प्रशासकीय पातळीवर या योजनेचा लाभ किती थकीत शेतकऱ्यांना मिळू शकतो, याची पडताळणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

दरम्यान, प्रशासनाने आता शासनाच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी निश्‍चित केली आहे. जिल्ह्यातील १४ बँकांकडील १० हजार ९२० शेतकरी या योजनेस पात्र ठरले आहेत. त्यांचे सुमारे ५१ कोटी १० लाख रुपयेचे कर्ज माफ होणार आहे. त्यात सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेकडील आहेत. त्यांची संख्या ७ हजार ८६६ असून या शेतकऱ्यांना २६ कोटी ३१ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. 

बँकनिहाय कर्जमाफी स्थिती

बँक ऑफ इंडिया-१ हजार ५७५ शेतकरी (१० कोटी ७८ लाख), स्टेट बँक ऑफ इंडिया - १२६ शेतकरी (१ कोटी ६ लाख रुपये), बँक ऑफ महाराष्ट्र-२३४ शेतकरी (१ कोटी ८७ लाख), विदर्भ कोकण ग्रामीण बँक - शेतकरी ५१२ (३ कोटी ९० लाख), युनियन बँका ऑफ इंडिया- शेतकरी १३५ (१ कोटी ३४ लाख), सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया- शेतकरी ९५ (८८ लाख), बँक ऑफ बडोदा - शेतकरी ५० (६५ लाख), सिंडिकेट बँक- शेतकरी १०५ (२ कोटी ९४ लाख), कॅनरा बँक - शेतकरी १२ (१३ लाख), युको बँक - शेतकरी २३ (१६ लाख), फेडरल बँक - शेतकरी १३ (११ लाख), कॉर्पोरेशन -शेतकरी ५८ (६६ लाख), आयडीबीआय बँक - शेतकरी ३२ (३१ लाख) अशा प्रकारे १४ बँकांकडील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com