सांगली : पूरग्रस्तांसाठी १०२ कोटी प्राप्त; लवरकच वितरण

 102 crore received for the rainstorms in Sangli district
102 crore received for the rainstorms in Sangli district

सांगली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये जुलै व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये पसरले. या पूर परिस्थिमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांना मदत देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार सांगली जिल्ह्याला सुमारे १०२ कोटी ५१ लाख ७८ हजार रुपयांची मदत मिळाली आहे. शासकीय सर्वेक्षण आणि निकषांच्या चौकटीत राहून त्याचे लवकरच वितरण केले जाईल. 

जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदीकाठच्या गावातील लोकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस व मिरज तालुक्‍यांतील शेकडो लोकांना त्याचा फटका बसला. 

महापूर, अतिवृष्टीमुळे पूर्णत: नष्ट झालेली पक्की व कच्ची घरे, पडझड झालेली पक्की व कच्ची घरे, मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली पक्की व कच्ची घरे, पक्की घरे जिथे किमान १५ टक्के पडझड झाली आहे व घर मालक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अशी घरे पूर्णत: पाडणार आहेत, अशा पात्र कुटुंबांना ग्रामीण व शहरी भागानुसार लागू असलेली पंतप्रधान आवास योजना, शबरी, रमाई आणि आदिम आदी घरकूल योजनेखाली लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी पुणे विभागातील सांगली जिल्ह्यासाठी १०२ कोटी ५१ लाख ७८ हजार ९०० रुपये शासनाने मंजूर केले आहेत आणि हा निधी संबंधित प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 

वाळव्यात सर्वाधिक नुकसान 

वाळवा तालुक्‍यातील पुराने बाधित घरांसाठी प्रशासनाच्या वतीने सुमारे दोन कोटी २६ लाख ५६ हजार रुपयांची मदत नागरिकांना देण्यात आली आहे. ३७ गावांमधील ९४४ जणांना लाभ मिळाला आहे. देण्यात वाळवा पंचायत समिती यशस्वी ठरली आहे.

तालुक्‍यातील धोत्रेवाडी, तांबवे, कासेगाव, कोळे, नरसिंहपूर, शिरटे, बहे, खरातवाडी, हुबालवाडी, ताकारी, बिचुद, रेठरेहरणाक्ष, दुधारी, फार्णेवाडी, बोरगाव, बनेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, मसूचीवाडी, जुने व नवेखेड, वाळवा, शिरगाव, मर्दवाडी, कारंदवाडी, कृष्णानगर, मिरजवाडी, ठाणापुडे, चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडेखुर्द, कुंडलवाडी, तांदुळवाडी, कोरेगाव, कणेगाव, भरतवाडी, शिगाव या गावांचा समावेश आहे. या गावांतील सुमारे ९२७ घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. ११७७ घरे धोकादायक बनली आहेत. तर अंशतः पडलेल्या घरांची संख्या २९७१ इतकी आहे. अशा एकूण बाधित घरांची संख्या ५०७५ इतकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com