भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०५ कोटी थकीत 

भंडारा ः जिल्ह्यातील तब्बल १०५ कोटीचे धान चुकारे रखडले आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाकडून मदत तर दूरच परंतू हक्‍काचे पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
105 crore of paddy growers in Bhandara district pending payment
105 crore of paddy growers in Bhandara district pending payment

भंडारा ः जिल्ह्यातील तब्बल १०५ कोटीचे धान चुकारे रखडले आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाकडून मदत तर दूरच परंतू हक्‍काचे पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. 

केंद्र सरकारने १८३५ रुपयांचा हमीभाव धानाला जाहीर केला होता. त्यात राज्य सरकारने ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये सानुग्रह अनुदानाची भर टाकली. भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रांवर १५ एप्रिलपर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्‍विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ क्‍विंटल धानाचा समावेश आहे. 

खरेदी करण्यात आलेल्या या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये इतकी आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले. त्यानंतरही १०५ कोटी ३५ लाख २७ हजार ७५ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. 

गेल्या महिनाभरापासून राज्यात ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपायाअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे शेतीची कामे ठप्प असून शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. अशा वेळी शासनाकडून मदत तर दूरच परंतु हक्‍काचे पैसेही मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे शासनाने आजवर केवळ हमीभावानेच चुकारे केले आहेत. बोनस अणि सानुग्रह अनुदानापोटी कोट्यवधींची थकबाकी शासनाकडे आहे. 

धान खरेदीला मुदतवाढ  जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१९ पासून धान खरेदीला सुरुवात झाली. ९८ हजार १२८ शेतकऱ्यांनी धान विक्री केली. त्यानंतर आता पुन्हा गुरुवार (ता. ३०) पर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com