agriculture news in Marathi 105 ton Hapus mango export Maharashtra | Agrowon

हापूसची १०५ टन निर्यात

राजेश कळंबटे 
गुरुवार, 9 एप्रिल 2020

हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गेले काही दिवस पणन, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. 

रत्नागिरी ः हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गेले काही दिवस पणन, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. मुंबईतील वाशी मार्केटमधील पाच कंटेनरमधून सुमारे १०५ टन हापूस समुद्रमार्गे संयुक्त अरब अमिराती आणि ओमानला रवाना झाला आहे. आंबा बागायतदारांसाठी ही दिलासादायक गोष्ट ठरली आहे.

कोरोनामुळे देशासह परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम शेतमालासह विविध प्रकारच्या फळांच्या निर्यातीला खो बसला होता. ऐन हंगामात ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले होते. सुमारे पाच ते दहा टक्के आंबा तयार झाला असून त्याची विक्री कशी करायची, असा प्रश्‍न होता; मात्र गेल्या आठ दिवसात शेतमाल वाहतुकीला मिळालेली परवानगी बागायतदारांसाठी उपयुक्त ठरली.

त्यामुळे बागांमधील तयार आंबा किमान बाजार समित्यांपर्यंत पोचवणे शक्य होऊ लागले आहे. त्यानंतर पणन मंडळ, कृषी विभाग, आत्मा यासह काही खासगी व्यापाऱ्यांनी हापूसच्या विक्रीसाठी थेट ग्राहकांपर्यंत साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. 

हापूस विक्रीचे वाशी हे सर्वात मोठे केंद्र आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये कोकणामधून सुमारे २२ हजार पेट्या वाशीत दाखल झाल्या. हा माल विक्री कुठे करायचा हा प्रश्‍न होता. त्यादृष्टीने आखाती देशांमधील निर्यातीला चालना देण्यासाठी हालचाली सुरु होत्या. त्याला अखेर यश मिळाले.

समुद्रमार्गे शुक्रवारी (ता. ४) पाच कंटेनर मुंबईतून रवाना झाले. त्यातील चार कंटेनर संयुक्त अरब अमिरातीला तर एक कंटेनर ओमानला जाणार आहे. या दोन्ही देशांना पुरवण्यात आलेला माल निर्यातदारांमार्फत पाठविला गेल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले. एकूण १०५ टन आंब्याची निर्यात सुरु झाल्यामुळे वाशीत साठा होणार नाही. 

निर्यातीला झालेली सुरवात आंबा बागायतदारांना दिलासा देणारी ठरु शकते. १२ एप्रिलनंतर मोठ्याप्रमाणात आंबा दाखल होणार आहे. सध्या मालाला ग्राहक नसल्यामुळे दर पडलेले आहेत. पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत पेटीला दर मिळत आहे. निर्यातीला पाठवलेल्या आंब्यालाही माफक दर मिळाला आहे. 

आत्मामार्फत ४४० पेटी साताऱ्यात
उपविभागीय कृषी अधिकारी जी. बी. काळे यांच्यासह राजापूर तालुका कृषी अधिकारी जगताप यांच्या प्रयत्नातून राजापूर आणि रत्नागिरीतील सुमारे ४४० आंब्याच्या पेट्या आत्माच्या माध्यमातून कराड, सातारा, फलटणला शनिवारी रवाना झाल्या आहेत. शेतकरी ते थेट ग्राहक अशी यंत्रणा आत्माच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...